शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल तूर्तास महाराष्ट्रतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 16:08 IST

दिल्लीच्या आयुक्तांना महिन्याभराची मुदतवाढ; २ मार्चला होणार नवीन नियुक्ती

ठळक मुद्दे पटनायक हे ३१ जानेवारीला निवृत्त होणार असल्याने त्याच्या जागी जायसवाल यांची निवड केली जाईल, अशी चर्चा गेल्या आठवड्याभरापासून रंगली होती .दिल्लीचे मावळते पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना ३० दिवसाची मुदतवाढ देण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

जमीर काझी

मुंबई - पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल प्रतिनियुक्तीवर दिल्लीत जाणार की राहणार या बाबतच्या चर्चेवर तूर्तास महिनाभरासाठी पडदा पडला आहे. दिल्लीचे मावळते पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना ३० दिवसाची मुदतवाढ देण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जायसवाल सध्यातरी राज्यात राहणार हे निश्चित झाले आहे. पटनायक हे ३१ जानेवारीला निवृत्त होणार असल्याने त्याच्या जागी जायसवाल यांची निवड केली जाईल, अशी चर्चा गेल्या आठवड्याभरापासून रंगली होती . 

डीजी सुबोध जायसवाल बनणार दिल्लीचे पोलीस आयुक्त ?

कोरेगाव भीमा दंगल तपास प्रकरण एनआयएकडे देण्यावरून  राज्य व केंद्र सरकारमध्ये मोठा वादंग निर्माण झाला आहे. पार्श्वभूमीवर जायसवाल यांच्या बाबतचा निर्णय महत्वपुर्ण ठरला होता. केंद्र सरकारच्या मर्जीतले असलेल्या सुबोध जायसवाल दिल्लीचे आयुक्त बनल्यास त्याच्या जागेवर सेवाजेष्ठतेनुसार  होमगार्डचे महासमादेशक संजय पांड्ये यांचा दावा होता. मात्र, फडणवीस सरकारने गेली ५ वर्ष त्यांना जाणीवपूर्वक आडगळीत ठेवले होते. त्यामुळे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कायद्याप्रमाने गैरप्रकारावर धडाकेबाज कारभार करणाऱ्या पांड्ये यांना महाविकास आघाडीचे सरकार न्याय देते की, त्यांना डावलून अन्य कोणाची नियुक्ती करते, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.

 संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी पोलीसांनी गुन्हेगारांच्या तंत्रांचा अभ्यास करावा - मुख्यमंत्री 

सुबोध जायसवाल हे १९८५ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. गेली अकरा महिने पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहत आहेत. त्यापूर्वी त्यांना जेमतेम आठ महिने मुंबईच्या आयुक्त म्हणून काम करता आले. त्यामुळे त्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीच्या आयुक्त बनविण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याची इच्छा आहे, असे आयपीएस वर्तुळात चर्चा आहे. 

मुंबई आयुक्त निवडी वेळीच होणार डीजीपीच्या नियुक्तीचा निर्णयमुंबईचे आयुक्त संजय बर्वे यांच्य वाढीव मुदतवाढ २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्यावेळी मुंबईला दुसरा आयुक्त दिला जाणार आहे. आता दिल्लीच्या आयुक्तपदी जायसवाल यांची निवड झाल्यास त्याचवेळेस त्याच्या वारसदार निश्चित करावा लागणार आहे. मुंबई आयुक्तपदासाठी एसीबीचे प्रमुख परमबीर सिंग यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याशिवाय सेवा जेष्ठतेनुसार संजय पांड्ये, पोलीस गृहनिर्माण बिपीन बिहारी, कारागृहचे सुरेंद्र पांड्ये, राज्य सुरक्षा महामंडळचे के. कनकरत्नम, एफएसलेचे हेमंत नागराळे यांचा सेवा जेष्ठतेनुसार क्रम आहे.

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली