शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:25 IST

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नागपूर : नागपुरातील एका व्यक्तीला मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात कारवाईची भिती दाखवत डिजिटल अरेस्ट करून २३ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

रंजनकुमार विष्णुचरण पटनायक (६०, जगतसिंगपूर, ओडिसा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे भासवून आणि मनी लाँड्रिंगसाठी कारवाई करण्याची धमकी देऊन एका व्यक्तीची २३.७१ लाख रुपयांची फसवणूक केली होती. आरोपी . ही घटना २ ते ३ जुलै दरम्यान घडली. तक्रारदाराला दूरसंचार विभाग आणि मुंबई पोलिसांच्या कुलाबा पोलिस स्टेशनचे असल्याची बतावणी करण्यात आली होती. त्याला घाबरविण्यासाठी मुंबई पोलिस, भारतीय सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, आरबीआय आणि ईडीचे बनावट सील असलेले बनावट कागदपत्रे पाठवण्यात आली.तक्रारदाराला बँक ऑफ महाराष्ट्र खात्यात २३ लाख ७१ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले. १५ जुलै रोजी सायबर पोलिसांनी आयटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांना रंजनकुमारचे बँक खाते आणि मोबाईल नंबर सापडला. त्याचा पत्ता बनावट असल्याचे आढळून आले. त्याचा मोबाईल नंबर देखील बंद होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, पोलिसांनी पटनायकला भुवनेश्वर येथून अटक केली. त्याला ११ ऑगस्टपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. पटनायकच्या खात्यात जमा झालेले १९.९० लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार,शंकर पांढरे, विनोद तोंडफोडे, रिंकेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस