सायकलस्वाराच्या खिशातून धूमस्टाईलने लांबविला मोबाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 13:46 IST2022-03-05T13:45:27+5:302022-03-05T13:46:08+5:30
Crime News : महानगर नगरातील हंसराज पांडे हे गुरुवारी सायंकाळी एका संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या पत्रिका वाटप करीत होते.

सायकलस्वाराच्या खिशातून धूमस्टाईलने लांबविला मोबाइल
जळगाव : एका संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या पत्रिका वाटप करून ओसवाल जैन बोर्डिंगजवळून सायकलवरून जाणाऱ्या हंसराज बिहारीलाल पांडे (४५, रा. महाजन नगर) यांच्या खिशातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धूमस्टाईलने मोबाइल चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७.३५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगर नगरातील हंसराज पांडे हे गुरुवारी सायंकाळी एका संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या पत्रिका वाटप करीत होते. पत्रिका वाटपाचे काम आटोपून ३ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता जुने बसस्थानकाच्या मागील गल्लीतून सायकलने जात असताना ओसवाल जैन बोर्डिंगजवळ मागून दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये किंमतीचा मोबाइल जबरीने हिसकावून नेला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली. परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.