शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धूम स्टाईलने तरुणाच्या हातातून मोबाईल लांबविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 10:19 IST

Crime News : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील अतुल शांताराम मराठे (वय २१) हा तरुण कल्याण येथे ॲमेझॉन कंपनीत असोसिएट वर्कर म्हणून नोकरीस आहे.

जळगाव : रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून मागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धूम स्टाईलने मोबाईल चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील बालनिरीक्षणगृहाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील अतुल शांताराम मराठे (वय २१) हा तरुण कल्याण येथे ॲमेझॉन कंपनीत असोसिएट वर्कर म्हणून नोकरीस आहे. सुट्टीवर असल्याने तो १ एप्रिल रोजी घरी आला होता. दरम्यान, ४ एप्रिल रोजी कल्याण जाण्यासाठी तो जळगावातील आकाशवाणी चौकात ट्रकने आला. त्यानंतर आकाशवाणी चौकाकडून ते रेल्वे स्टेशनकडे पायी निघाला.

बालनिरीक्षणगृहाजवळून जात असताना त्याने रेल्वेचे लोकेशन बघण्यासाठी आपला मोबाईल खिशातून बाहेर काढला. त्याचवेळी मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या एका तरुणाने अतुलच्या हाताला झटका मारीत मोबाईल हिसकावून नेला. त्याने लागलीच तत्काळ जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर मंगळवारी सकाळी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव