२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:58 IST2025-07-29T09:58:18+5:302025-07-29T09:58:45+5:30

पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तिथे बेडवर धीरजचा मृतदेह पडला होता. 

Dheeraj Kansal, a young man from Delhi, committed suicide due to loneliness | २५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...

२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...

नवी दिल्ली - धीरज कंसल, व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटेंट असलेल्या या तरुणाने वयाच्या २५ व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलले आहे. इतक्या लहान वयात या तरुणाने एकटेपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले आहे. उच्चभ्रू वस्ती बंगाली मार्केटमध्ये राहणाऱ्या धीरजने शरीरात हेलियम गॅस टाकून आत्महत्या केली आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे आत्महत्या करण्याचा घातक प्रकार समोर आला आहे. 

हरियाणातील धीरज हेलियम गॅस सिलेंडरचा पाइप तोंडात घेऊन बिछान्यावर पडला होता. तो महिपालपूर येथे पीजी म्हणून राहायचा. पोलिसांनी सिलेंडर आणि पाइपसह मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. एअरबीएनबी गेस्ट हाऊसमधून पोलिसांना एक कॉल आला होता. त्यात एका गेस्टचा दरवाजा आतून बंद आहे आणि खोलीतून प्रचंड दुर्गंध येत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धीरजने गेस्ट हाऊसमधील पहिला मजला २८ जुलैपर्यंत भाड्याने घेतला होता. धीरज सोमवारी त्याची खोली सोडणार होता असं गेस्ट हाऊस मालकाने सांगितले. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तिथे बेडवर धीरजचा मृतदेह पडला होता. 

"मृत्यू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा"

पोलिसांनी घटनास्थळी तपास केला तेव्हा तिथे एक सुसाईड नोट सापडली. त्यात लिहिलं होते की, प्लीज, माझ्या मृत्यूवर दुखी होऊ नका. मृत्यू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे. आत्महत्या करणे वाईट नाही कारण माझ्यावर कुणाची जबाबदारी नाही आणि मी कुणाशीही इतका जोडलेलो नाही. माझ्यामुळे कुणी संकटात येणार नाही असं त्याने म्हटले होते. धीरजच्या तोंडावर मास्क होता. ज्यातून बारीक पाइक वॉल्व आणि मीटरच्या सिलेंडरशी जोडली होती. चेहऱ्यावर पारदर्शक प्लॅस्टिक होते. गळ्याभोवती ते बांधले होते. 

धीरजने मरण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. जर तुम्हाला माझी फेसबुक पोस्ट मिळाली नाही तर ही नोट मी लिहून जात आहे. फेसबुकची पोस्ट डिलिट होईल असं नाही. मी निघून जाईल परंतु त्याचा दोष कुणालाच देऊ नका असं धीरजने म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला तेव्हा धीरजच्या वडिलांचे २००३ साली निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या आईने अन्य व्यक्तीसोबत लग्न केले. त्याला कुणी भाऊ बहीण नाही. सध्या तो पीजी म्हणून गेस्ट हाऊसला राहत होता. 

हेलियम गॅस काय आहे?

पहिल्यांदाच अशाप्रकारे आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. हेलियम गॅस शरीरात घेऊन सुसाईड करणे हे याआधी घडले नव्हते. आत्महत्या करण्याचा हा अतिशय जीवघेणा मार्ग आहे. हेलियम असा वायू आहे जो शरीरात जातात फुफ्फुसातील ऑक्सिजन कमी करतो. ज्यामुळे कुठल्याही संघर्षाशिवाय, दुखापतीशिवाय श्वास गुदमरल्यासारखे वाटते असं पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Dheeraj Kansal, a young man from Delhi, committed suicide due to loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.