विवाहित महिलेला पळवले म्हणून तरुणाला झाडाला बांधून मारले, पाच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 02:13 PM2019-05-16T14:13:19+5:302019-05-16T14:14:17+5:30

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.

Dhar: A man & his two relatives including a minor were tied to a tree & beaten up | विवाहित महिलेला पळवले म्हणून तरुणाला झाडाला बांधून मारले, पाच अटकेत

विवाहित महिलेला पळवले म्हणून तरुणाला झाडाला बांधून मारले, पाच अटकेत

googlenewsNext

धार (मध्य प्रदेश) -  मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. एका विवाहित महिलेला पळवून नेल्याचा आरोप या तरुणावर असून, या कामात त्याच्या दोन चुलत बहिणींनी त्याला मदत केली, असा आरोप ठेवत संबंधित महिलेल्या पतीने काही जणांसोबत मिळून या तिघांना मारहाण केली. 

धार जिल्ह्यातील अर्जुन कॉलोनी येथील हा प्रकास असून, याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुण आणि दोन तरुणींना एका झाडाला बांधलेले दिसत आहेत. तर झाडाभोवत शेकडो लोक गोळा झालेले आहेत. मात्र पीडितांच्या मदतीला कुणीही आले नाही. तर काही लोक या घटनेचा व्हिडीओ काझताना दिसत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने होत असलेली मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण एका वृद्धाने तिला पकडले. नंतर तिलाही जबर मारहाण करण्यात आली. 




दरम्यान, या मारहाणी प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच पाच आरोपीना अटक करण्यात आली असून, चार जण फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. 

Web Title: Dhar: A man & his two relatives including a minor were tied to a tree & beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.