Devar Bhabhi Crime News: पाटणाच्या फुलवारीशरीफ पोलीस स्टेशन परिसरातील भुसौला दानापूर येथे शनिवारी रात्री कौटुंबिक वादातून २४ वर्षीय रिझवान कुरेशी याची हत्या करण्यात आली. रिझवान याच्या हत्येचा आरोप त्याच्याच वहिनीवर करण्यात आला आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत झोपलेल्या दीरावर वहिनीने कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्हा केल्यानंतर ती फरार झाली. रिझवानचा धाकटा भाऊ शाहबाज कुरेशीची याची पत्नी शबनम हिने रिझवानवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली.
कसा उघडकीस आला प्रकार?
सकाळी मोठी वहिनी रिझवानला उठवण्यासाठी गेली. तिने खोलीच्या बाहेरून हाक मारली पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती आत गेली. तिने लाईट चालू केला तेव्हा रिझवानचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसला. खोलीतील दृश्य पाहून ती ओरडू लागली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. फुलवारीशरीफ पोलीस ठाण्याचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले आणि एफएसएल टीमला बोलावण्यात आले. तपासानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हत्येचे कारण कौटुंबिक वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वहिनीला दीरासोबत राहायचं होतं...
कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, रिझवानचे लग्न एक वर्षापूर्वी झाले होते. सध्या त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली होती. आरोपी शबनमला आधीपासूनच रिझवान आवडत होता. लग्नापूर्वी तिने एकदा रिझवानसोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की रिझवान तिच्यासोबत राहण्यास नकार देत होता, ज्यामुळे ती रागावली आणि ही घटना घडली. मेहुण्याला मारण्यापूर्वी तिने तिच्या पतीला खोलीत बंद केले आणि त्यानंतर हत्या करून फरार झाली.