शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ravi Rana : जामीन मिळूनही रवी राणांना आजची रात्रंही काढावी लागणार तळोजा कारागृहात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:11 IST

Ravi Rana is still in Taloja jail tonight : कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.

पनवेल : आमदाररवी राणा यांना कोर्टाकडून जरी आज जामीन अर्ज मंजूर झाला असला तरी आजची रात्रही तळोजा कारागृहातच जाणार आहे. जामीनाची प्रत कारागृह प्रशासनाला अद्याप मिळाली नसल्याने राणा यांना बुधवारची म्हणजे आजची रात्र कारागृहातच घालवावी लागणार आहे. कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.

शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदाररवी राणा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन मंजूर करताना कोर्टाने राणा दाम्पत्याला सक्त ताकिद देत कठोर अटीं घातल्या आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर नवनीत राणा यांना तुरुंगांतून थेट रुग्णालयात नेण्यात आलं. 

नवनीत राणा यांची भायखळा तुरुंगातून  थेट मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानेच्या दुखण्यामुळे त्यांना तुरुंगातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. रात्री त्यांना मान, पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आमदार रवी राणा यांची अद्याप तळोजा तुरुंगातून सुटका झालेली नाही.   

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाjailतुरुंगSessions Courtसत्र न्यायालयMLAआमदार