शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या भावाची नैराश्यातून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 23:22 IST

Suicide : पिंपळे गुरव : हाताची नस कापून घेतला गळफास

पिंपरी : हाताची नस कापून गळफास घेऊन एका तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केली. पिंपळे गुरव येथे बुधवारी (दि. १६) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. कर्ज तसेच व्यवसायात यश येत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  दीपक रामचंद्र साबळे (वय ३१, रा. जयभवानी नगर, पिंपळे गुरव), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत दीपक हा सांगवी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी केतन साबळे यांचा लहान भाऊ होता. पिंपळे गुरव येथे एका इमारतीत साबळे कुटुंब वास्तव्यास आहेत. इमारतीच्या एका मजल्यावर दीपक हा त्याच्या आईवडिलांसह राहत होता. तर केतन साबळे हे त्यांची पत्नी आणि मुलांसोबत राहतात. आईवडील बाहेरगावी गेल्याने दीपक घरी एकटाच होता. त्यावेळी त्याने उजव्या हाताची नस कापून घराच्या छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेतला. 

आईवडील सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी बराचवेळ आवाज देऊनही दीपक याने दरवाजा उघडला नाही. याबाबत त्याच्या आईवडिलांनी काही जणांना सांगितले. नागरिकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी दीपक याने गळफास घेतला असल्याचे दिसून आले. याबाबत त्याचा भाऊ केतन साबळे यांना तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. केतन साबळे हे कर्तव्य बजावत होते. त्यांनी लगेचच घर गाठले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक याला सांगवी येथील जिल्हा सर्वेापचार रुग्णालयात हलविण्यात आले. डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

मयत दीपक हा अविवाहित होता. २०१२ पासून त्याने काही व्यवसाय केले. मात्र त्यात त्याला यश आले नाही. पिंपळे गुरव येथे त्याचे हाॅटेल होते. मात्र लाॅकडाऊनमुळे ते हाॅटेल बंद होते. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. तसेच कर्ज देखील झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. त्यातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस