हद्दपारीचा भंग करणाऱ्याला सुऱ्यासह अटक
By सदानंद नाईक | Updated: June 5, 2023 20:02 IST2023-06-05T20:02:01+5:302023-06-05T20:02:10+5:30
रविवारी दुपारी १२ वाजता केली कारवाई

हद्दपारीचा भंग करणाऱ्याला सुऱ्यासह अटक
सदानंद नाईक, उल्हासनगर: हद्दपारीचा भंग करून सुऱ्यासह राहणाऱ्या विकास वाडेकर याला उल्हासनगर पोलिसांनी रविवारी दुपारी १२ वाजता अटक करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. उल्हासनगर आशेळेगाव मध्ये राहणारा विक्की उर्फ विकास विजय वाडेकर याला ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगरे व रायगड जिल्ह्यातील कर्जत व पनवेल तालुक्यातून पोलीस परिमंडळ-४ यांनी हद्दपारीची कारवाई केली. दरम्यान हद्दपारीचा भंग करून विकास शहरात राहत असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाल्यावर, रविवारी दुपारी देशमुखनगर येथून त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे सुरा मिळून आला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.