मुलीच्या बदनामीची धमकी देत २० लाख रुपयांची मागणी; तिघांवर खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 23:49 IST2021-11-17T23:49:26+5:302021-11-17T23:49:58+5:30
सतीश याने तालुक्यातील एका मुलीस फूस लावून पळवून नेत लग्न लावले. तीच्यासोबत फोटोही काढले हो

मुलीच्या बदनामीची धमकी देत २० लाख रुपयांची मागणी; तिघांवर खंडणीचा गुन्हा
अमळनेर जि. जळगाव : तरुणीसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामीची धमकी दिली. तसेच २० लाख रुपये मागणाऱ्या नाशिकच्या महिला वकीलासह तीन जणांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. अलका शेळके मोरे (नाशिक), सतीश उर्फ सागर लक्ष्मण कोळी (शिरसाळे ता. अमळनेर) आणि शरद उखा पाटील (तरवाडे ता. अमळनेर) अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सतीश याने तालुक्यातील एका मुलीस फूस लावून पळवून नेत लग्न लावले. तीच्यासोबत फोटोही काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सतीश याने या मुलीच्या मामाकडे २० लाखांची खंडणी मागितली. त्यासाठी ॲड. पाटील व शरद यांची मदत घेतली. या तीनही जणांनी मुलीच्या मामाला २५ ऑक्टोबर रोजी अमळनेर बाजार समितीच्या आवारात बोलावून मारहाण केली व ॲट्रासीटी दाखल करण्याची धमकी दिली तसेच पैशांची मागणी केली. मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरुन वरील तीनही जणांविरुद्ध मारवड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत.