शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत केली शरीरसुखाची मागणी; शेजारी राहणाऱ्या युवकाचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 22:38 IST

तरुणीचा विनयभंग, युवकाविरुद्ध गुन्हा 

अमरावती : तरुणीचा कपडे बदलवित असतानाचा व्हिडीओ दाखवून आरोपीने तिचा विनयभंग केला. शरीरसुखाची मागणी करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना शहरात १० जानेवारी ते २४ जुलै २०२० दरम्यान घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला.  २५ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी चेतन ऊर्फ गजानन सुभाष चौके (२३, रा. परिगणित कॉलनी) याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. 

पोलीस सूत्रांनुसार, विवाहतेचे लग्नापूर्वी नांदेड जिल्ह्यात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय युवकाशी पुणे येथील एका खासगी कंपनीत कार्यरत असताना प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती आपल्या राहत्या घरी अमरावती येथे जानेवारी महिन्यात आली असता, तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या आरोपी चेतनने तिच्याशी जवळीक साधून ती कपडे बदलत असतानाचा त्याच्याकडे असलेला व्हिडीओ तिला दाखविला. बदनामीच्या भीतीपोटी घाबरलेल्या तरुणीने या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही. याचाच फायदा घेऊन त्याने तिचा विनयभंग केला. ती बदनामीपोटी ही बाब कुणाला सांगू शकत नव्हती.

तिचे नांदेडच्या तरुणाशी प्रेम असल्याने त्याच्याशी लग्नाची बोलणी सुरु होती. त्यामुळे तिने आरोपी चेतनकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिचे नांदेडच्या युवकाशी लग्न झाले. मात्र, लग्नानंतरही चेतन तिचा पाठलाग करीत राहिला त्याने नांदेड गाठून तिच्या सासरी जाऊन पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिला शरीरसुखाची मागणी करून  त्याच्याकडे असलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. चेतनचे हे कृत्य सहन न झाल्याने अखेर  त्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पीएसआय राजेश लेवटकर करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी