लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 04:57 PM2021-04-03T16:57:44+5:302021-04-03T16:58:09+5:30

उल्हासनगर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ झाली असून पोलिसही हैराण झाल्याचे चित्र शहरात आहे.

Demanded to give the girl; Manager of Diksha Lodge beaten in Ulhasnagar | लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण

लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण

googlenewsNext

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहाड फाटक परिसरातील दिक्षा लॉज मध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जाऊन मुलगी देण्याची मागणी करून न दिल्याच्या रागातून, नितीन बोथ, कमल बोथ व रोहित गायकवाड यांनी लॉज मॅनेजर सतीश अमीन याना मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ झाली असून पोलिसही हैराण झाल्याचे चित्र शहरात आहे. कॅम्प नं-१ शहाड फाटक परिसरात दिक्षा नावाचे लॉज आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान परिसरातील नितीन बोथ, कमल बोथ व रोहित गायकवाड असे तिघे जाऊन आम्हाला मुलगी दे, अशी मागणी लॉज मॅनेजर सतीश अमीन यांच्याकडे केली. त्यांनी येथे असे काही चालत नाही असे सांगितले. याचा राग येऊन तिघांनी लोखंडी रॉड, फायटर यांनी मॅनेजर सतीश अमीन यांच्यासह त्यांच्या भावाला लॉज व रस्त्यावर आणून जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या लॉज मॅनेजर सतीश यतीन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Demanded to give the girl; Manager of Diksha Lodge beaten in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.