शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तीस हजाराच्या लाचेची मागणी; महावितरण अभियंत्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:40 IST

Crime News : लातूर येथील एका हाॅटेलचालकाने विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून ताे थेट वीज प्रवासहाचा वापर करुन वीजेची चाेरी केल्याची प्रकरण घडले

लातूर : हाॅटेलच्या विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून थेट वीज प्रवाहाचा वापर करुन वीजेची चाेरी केल्याच्या प्रकरणात तक्रारदार वीज ग्राहकाकडे तीस हजाराची लाच मागितल्याप्रकरणी लातूर येथील महावितरण शाखा क्रमांक १ च्या सहायक अभियंत्याविराेधात गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली.

लातूर येथील एका हाॅटेलचालकाने विद्युत मीटरमधून वीज प्रवाह काढून ताे थेट वीज प्रवासहाचा वापर करुन वीजेची चाेरी केल्याची प्रकरण घडले. याबाबत कारवाई न करण्याच्या कामासाठी महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याने तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदार हाॅटेलचालकाने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची तडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निषपन्न झाले. लातूर शहरातील नांदेड राेडवरील गरुड चाैकात असलेल्या महािवतरणच्या कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवार आणि बुधवारी सापळा लावला. यावेळी तक्रारदार हाॅटेलचालक वीजग्राहकाने सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात गेले हाेते. मात्र, संशय आल्याने ३० हजारांची लाच स्वीकारण्यास सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याने जाणिवपूर्वक टाळाळाट केली. याबाबत लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सहायक अभियंता शेख मन्सूर नजीर याच्याविराेधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलीस उपाधीक्षक माणिक बेंद्रे यांनी दिली. सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पाेलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, सहायक पाेलीस उपनिरीक्षक संजय पस्तापुरे, पाेलीस हवालदार लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, माेहन सुरवसे, शिवकांता शेळके, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दीपक कलवले, रुपाली भाेसले, राजू महाजन यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणlaturलातूरCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा