शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Voilence : दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दंगेखोरांची पोलिसांनी केली धरपकड सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 21:02 IST

Delhi Voilence : आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आता बरीच पोलीस पथकं दिल्ली परिसरात छापेमारी करत आहेत.

ठळक मुद्दे सर्वप्रथम आम्ही नगरसेवकाचा शोध घेत आहोत जो प्रकाशझोतात आल्यानंतर गायब झाला आहे.आयबी स्टाफ अंकित शर्मा हत्येप्रकरणी संशयित नगरसेवकच्या शोधात पोलीस पथके तैनात आहेत.

नवी दिल्ली - दिल्ली हायकोर्टाने फटकारल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दंगेखोरांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी अचानक अनेक विशेष पथके तयार करून कारवाई करण्यास सुरवात केली. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आता बरीच पोलीस पथकं दिल्ली परिसरात छापेमारी करत आहेत.दंगलखोरांना पकडण्यासाठी सिव्हिल पोलीस, स्पेशल सेल आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि जवानांना वेगवेगळ्या पथकात सामील केले गेले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, “हिंसाचारात सामील असलेल्या सर्व पाहिजेत व्यक्तींच्या शोधात पथके वेगवेगळ्या संभाव्य ठिकाणी छापे टाकत आहेत, तर सर्वप्रथम आम्ही नगरसेवकाचा शोध घेत आहोत जो प्रकाशझोतात आल्यानंतर गायब झाला आहे. उत्तर-पूर्व दिल्लीत तैनात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणाले की, "गुरू तेग बहादूर रुग्णालयात आमचे बरेच पोलीस कर्मचारी व्यस्त आहेत, तेथे अनेक जखमी दाखल आहेत. जखमींपैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही जखमींना शहरातील जय प्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मृत्यूनंतर आतापर्यंत जवळजवळ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांची संख्या ३० हुन अधिक आहे."विशेष आयुक्त आणि डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसाच्या वेळेस परिसराची स्थिती बरीच सुधारली आहे. तेथे तणावपूर्ण शांतता आहे. कोणतीही अनुचित घटना देखील घडलेली नाही. त्यामुळे गुरुवारी अनेक दंगेखोरांचा पोलिसांची पथकं शोध घेत आहेत. हिंसाचारासाठी जबाबदार आणि फरार असलेल्यांच्या शोधात पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली आहेत."

सहआयुक्त आलोक कुमार म्हणाले की, "आम्ही मंगळवारी झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या आयबी सुरक्षा सहाय्यक अंकित शर्माच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहोत. आतापर्यंत अडीचशेहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यातील बरेच निष्पाप आढळले आणि त्यांना घरी पाठवले. १०० हून अधिक लोक अद्याप कोठडीत आहेत. त्यांनी दंगेखोरांविषयी बरीच माहिती दिली आहे. "मंगळवारी हिंसाचारग्रस्त भजनपुरा आणि झाफराबाद येथे तैनात असलेल्या डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "आयबी स्टाफ अंकित शर्मा हत्येप्रकरणी संशयित नगरसेवकच्या शोधात पोलीस पथके तैनात आहेत." अंकित शर्माचे वडील रवींद्रकुमार शर्मा यांनीही फरार नगरसेवकाचे नाव आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी घेतले आहे.

पीडितांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात शांतता राखण्यात व्यस्त असले तरी वास्तविकता अशी आहे की उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरच पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी आधीच आपले कर्तव्य बजावले असते तर गुरुवारी दुपारपर्यंत हिंसाचारात ३४ लोक मारले गेले नसते. दिल्लीचे वातावरण शांत आणि आनंदी असले असते. 

Delhi Voilence : दिल्लीत केजरीवालांची 'फरिश्ते' योजना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, जखमींना मोफत उपचार

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू