शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Delhi Violence : कोण आहे शाहरुख?, त्याला कसं पकडलं?... दिल्ली पोलिसांनी सगळंच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 18:13 IST

Delhi Violence : शाहरुखने दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर गोळी झाडली आणि ८ राऊंड फायर केले.

ठळक मुद्देत्याच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम 186, 353, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देखील शिंगला यांनी दिली.घटनेनंतर पळ काढल्यानंतर तो प्रथम कनॉट प्लेसमधील पार्किंगमध्ये झोपला होता. शामलीमधील ज्या ठिकाण त्याला राहण्यास मदत केली त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक केली जाईल असं पुढे शिंगला यांनी सांगितले.

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचारादरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या शाहरुखला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत शाहरुख एक मॉडेल असल्याचे उघडकीस आले. तसेच तो टिकटॉकवर व्हिडिओ देखील बनवतो. त्याने मुंगेरमध्ये बनवलेल्या पिस्तुलातून गोळीबार केला. त्याने कट रचून गोळीबार केला की त्याच्याकडून अचानक हा गोळीबार झाला याचा शोध घेण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत.

Delhi Violence: पोलिसांवर पिस्तुल रोखून ८ राऊंड फायर करणाऱ्या शाहरुखला अटक

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजितकुमार शिंगला यांनी सांगितले की, त्याने तीन गोळ्या झाडल्या. आरोपीकडून पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पिस्तूल सेमी ऑटोमॅटिक आहे. शाहरुखला जिमचीही आवड आहे. बीए द्वितीय वर्षापर्यंत त्याने शिक्षण घेतले आहे . म्युझिक व्हिडिओ देखील त्याने बनवला आहे. गोळीबारानंतर दिल्लीहून पळून तो जालंधरला गेला. तेथून बरेली व नंतर शामलीला गेला. तेथे तो एका मित्राकडेच राहिला होता. शामली बसस्थानकाकडे जात असताना तेथून पोलिसांनी त्याला पकडले. शामलीमधील ज्या ठिकाण त्याला राहण्यास मदत केली त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील अटक केली जाईल असं पुढे शिंगला यांनी सांगितले.सुरुवातीच्या चौकशीत तो एकटाच आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला असल्याचे उघडकीस आले. त्याला कोर्टात हजर करायचे असून त्यानंतर उर्वरित लोकांची चौकशी केली जाईल. शाहरुखने पळ काढण्यासाठी एस्टीम गाडीचा वापर केला होता. आम्ही आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैनशी त्याचा काही संबंध आहे का? याची चौकशी करू. त्याच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम 186, 353, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती देखील शिंगला यांनी दिली.

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेखघटनेनंतर पळ काढल्यानंतर तो प्रथम कनॉट प्लेसमधील पार्किंगमध्ये झोपला होता. याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या वडिलांवर अमली पदार्थांच्या प्रकरणात आरोपी आहे. दिल्लीच्या झाफराबादमधील हिंसाचारादरम्यान गोळीबार केलेल्या  मोहम्मद शाहरुखला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती आहे. शाहरुखने दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दहिया यांच्यावर गोळी झाडली आणि ८ राऊंड फायर केले. दीपकने पिस्तूल काढून गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो कुटुंबासमवेत पळून गेला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसArrestअटक