शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी ६ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:34 IST

Delhi Violence : या हिंसाचारात ४० हून अधिक तर ठार आणखी अनेक जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाला जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे, असे भारताचे मुख्य न्यायमूर्ती  म्हटले आहे. उच्च न्यायालय सुनावणी करेल. यात कायदेशीर दाद मागण्याला आम्ही आडकाठी आणत नाही - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचाराशी संबंधित याचिकांवर ६ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी पार पडणार आहेत. अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाला जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे, असे भारताचे मुख्य न्यायमूर्ती  म्हटले आहे.गेल्या आठवड्यात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) मुद्दय़ावरून ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता असून दिल्ली पोलिसांनी परिस्थिती व्यावसायिक पद्धतीने हाताळली नाही, अशा शब्दात ताशेरे ओढले होते. या हिंसाचारात ४० हून अधिक तर ठार आणखी अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांसह कायदा अंमलबजावणी संस्थांवर ताशेरे ओढताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, पोलिसांनी हिंसक जमावाला मोकळे रान दिले. त्यांनी कुणाच्या परवानगीची वाट न पाहता कारवाई करायला पाहिजे होती. जर कुणी प्रक्षोभक भाषण करीत असेल तर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. हिंसाचाराबाबतच्या याचिकांवर सुनावणी करण्यास नकार देताना न्यायालयाने सांगितले होते की, शाहीन बाग निदर्शनांच्या मुद्दय़ावर सुनावणी करण्यासाठी अनुकूल स्थिती असली पाहिजे.

Delhi Violence: काय घडलं होतं त्याक्षणी? पोलिसाने सांगितले, दंगलखोर शाहरुखने माझ्यावर पिस्तूल रोखलं तेव्हा...

 

Delhi Violence : कोण आहे शाहरुख?, त्याला कसं पकडलं?... दिल्ली पोलिसांनी सगळंच सांगितलं!

न्या.एस.ए. कौल व न्या. के.एम. जोसेफ यांनी सांगितले होते की, शाहीनबाग प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांची व्याप्ती वाढवून त्यात हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी केली जाणार नाही. न्यायालयाने म्हटले होते की, आम्ही आमच्यासमोर सध्या जी याचिका आहे त्याच्या बाहेर जाणार नाही. हिंसाचाराच्या अनेक दुर्दैवी घटना झाल्या आहेत. शाहीनबाग येथे इतरांची गैरसोय करून लोकांनी आंदोलन करणे कितपत योग्य आहे यावर सध्या सुनावणी सुरू आहे. त्याच मुद्दय़ाचा आम्ही विचार करू, हिंसाचाराशी संबंधित याचिकांचा विचार आम्ही करणार नाही. त्यावर उच्च न्यायालय सुनावणी करेल. यात कायदेशीर दाद मागण्याला आम्ही आडकाठी आणत नाही, पण ती दाद उच्च न्यायालयाकडे मागावी. शाहीनबाग प्रकरणातील संवादक संजय हेगडे व साधना रामचंद्रन यांना न्यायालयाने सांगितले होते की, शाहीनबाग येथील लोकांनी तोडग्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यानुसार आता दिल्ली उच्च न्यायालयात हिंसाचाराप्रकरणी याचिकांवर सुनावणी ६ मार्चला पार पडणार आहे. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयdelhiदिल्ली