शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:06 IST

अधिकाऱ्यांकडून इशारा मिळताच काही पोलीस कर्मचारी ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी भंगाराचे सामान हटवून पाहिले तेव्हा जे समोर दिसले ते पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डोळे अवाक् झाले.

नवी दिल्ली - २२ जून २०२५ रोजी संध्याकाळचे ६ वाजले होते, दिल्लीच्या नजीक गाजियाबाद येथे पोलिसांची नियमित तपासणी सुरू होती. त्यावेळी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमधून एक ट्रक हायवेच्या दिशेने येताना दिसतो. हा ट्रक सामानाने भरला होता. पोलिसांना काही संशयास्पद वाटते त्यामुळे ट्रकला हात दाखवून रस्त्याशेजारी थांबवला जातो. वाहनचालकाची चौकशी केली जाते. त्यावेळी ट्रकमध्ये भंगार असल्याचे सांगत ते हरियाणाला घेऊन जात असल्याचे पोलिसांना चालक सांगतो. 

पोलिस ट्रकचालकाकडे कागदपत्रे मागते, ज्यावर तो ई वे बिल दाखवतो. वरून वरून ट्रकमध्ये भंगाराचे सामान दिसत होते. त्याची कागदपत्रेही चालकाकडे होती. परंतु घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी काही शंका वाटत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून इशारा मिळताच काही पोलीस कर्मचारी ट्रकमध्ये चढले आणि त्यांनी भंगाराचे सामान हटवून पाहिले तेव्हा जे समोर दिसले ते पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डोळे अवाक् झाले.

या ट्रकमध्ये भंगार केवळ नावापुरते होते, पोलिसांनी जेव्हा ते बाजूला हटवले तेव्हा त्याखाली विशेष प्रजातीचे लाकूड सापडले. या लाकडावर गुलाबी रंगही मारला होता. पोलिसांनी तातडीने ट्रकचालकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. त्या चौकशीत ही लाकडे सागवानाची होती, ज्याची जवळपास १ कोटी किंमत होती. या लाकडाचे वजन १४ टन होते. ज्याला साधारण २० क्विंटल भंगार आणि रद्दीच्या खाली घेऊन जात होते. बर्मा सागवानाची ही खेप दोन देशांच्या सीमापार करून भारतात आणली होती. 

या लाकडाला आधी म्यानमारमधून नेपाळला आणले गेले. त्यानंतर नेपाळमार्गे भारताच्या मणिपूरला नेले जात होते. त्यानंतर मणिपूरच्या इंफाल येथून हरियाणात नेले जात होते, जिथे तैय्यब आणि साकिर नावाच्या व्यक्तीला हे सोपवले जाणार होते. या घटनेत पकडलेला ट्रकचालक शहजाद शामली जिल्ह्यातील झिंझाना परिसरात राहणारा आहे. तर ट्रक क्लिनर शोएब छपरौली जिल्ह्यात राहतो. हे दोघेही लाकडाची खेप हरिणायाच्या तावडू येथे पोहचवणार होते, ज्या बदल्यात या दोघांनी मोठी रक्कम दिली जाणार होती असं पोलिसांनी सांगितले.

बर्मा सागवान लाकडाचं वैशिष्टे काय?

बाजारात चंदनासारखीच बर्मा सागवान लाकूड महाग असते. मुख्य म्हणजे हे लाकूड म्यानमार येथे सापडते. हे लाकूड उत्तम दर्जासाठी ओळखले जाते. यापासून सुंदर इनडोर फर्निचरपासून टिकाऊ आऊटडोर फर्निचर बनवले जातात. त्याची नैसर्गिक सुंदरता, मजबूती, प्रत्येक ऋतुमध्ये सुरक्षित राहण्याची क्षमता यामुळे बाजारात या लाकडाला मोठी मागणी आहे. मोदीनगर भागात पोलिसांनी १४ टन बर्मा सागवान लाकूड जप्त केले परंतु बाजारात त्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.

टॅग्स :Policeपोलिस