दिल्लीतील गांधी विहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन आग लावल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र प्रत्यक्षात एका तरुणीने आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचा कट रचला आहे. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीपोलिसांचे स्पेशल सीपी (लॉ अँड ऑर्डर) रवींद्र यादव यांनी सांगितलं की, रामकेश मीनाच्या हार्ड ड्राइव्ह आणि फोनमधून अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणामागील कट उघड झाला आहे.
तपासादरम्यान, पोलिसांनी रामकेशच्या डिव्हाइसमधून १५ हून अधिक अश्लील व्हिडीओ आणि ५० हून अधिक फोटो जप्त केले. यातील काही व्हिडीओ आरोपी अमृता चौहानचे होते. चौकशीदरम्यान अमृताने कबूल केलं की, तिने रामकेशला वारंवार तिचे व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले होते, परंतु जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिने हत्येची कट रचण्यास सुरुवात केली.
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
अमृता ही फॉरेन्सिक आणि कॉम्पूटर सायन्सची विद्यार्थिनी होती. ती 'क्राइम पेट्रोल' आणि अनेक क्राइम-थ्रिलर वेब सिरीजची फॅन होती. यावरून तिला गुन्ह्यानंतर पुरावे कसे नष्ट करायचे हे शिकता आलं. अमृता तिच्या दोन मित्रांसह, सुमित कश्यप आणि संदीप कुमार यांनी हा भयानक कट रचला. ५ ऑक्टोबरच्या रात्री तिघेही गांधी विहारला पोहोचले.
रामकेशची गळा दाबून हत्या करण्यात आली, नंतर खोलीत तूप, तेल आणि वाइन ओतून आग लावण्यात आली. अमृताला वाटलं की लहान खोलीत गॅस पसरेल आणि अर्ध्या तासानंतर सिलिंडरचा स्फोट होईल, ज्यामुळे ते पळून जातील. पण १२ मिनिटांतच सिलिंडरचा स्फोट झाला आणि ही चूक तिच्या खोटेपणाचा सर्वात मोठा पुरावा बनली.
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
अमृताने गुन्ह्याच्या ठिकाणाहून सर्व पुरावे, अगदी बोटांचे ठसे देखील पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या पथकाने मोबाईल डेटा, सीसीटीव्ही आणि हार्ड डिस्कचा तपास केला. दिल्ली पोलिसांच्या तिमारपूर पथकाने लोकेशन ट्रॅकिंगद्वारे १८ ऑक्टोबर रोजी अमृताला मुरादाबाद येथून अटक केली. त्यानंतर तिचे दोन साथीदार सुमित आणि संदीप यांनाही अटक करण्यात आली. अमृताच्या घरातून एक हार्ड डिस्क, रामकेशचा शर्ट आणि हत्येशी संबंधित वस्तू असलेली ट्रॉली बॅग जप्त करण्यात आली.
Web Summary : In Delhi, a woman killed her live-in partner for refusing to delete obscene videos of her. She and two accomplices strangled him, staged a fire, but police uncovered the crime through digital evidence. All three are arrested.
Web Summary : दिल्ली में एक महिला ने अश्लील वीडियो हटाने से इनकार करने पर लिव-इन पार्टनर की हत्या कर दी। उसने और दो साथियों ने गला घोंटकर आग लगा दी, लेकिन पुलिस ने डिजिटल सबूतों से अपराध का पर्दाफाश किया। तीनों गिरफ्तार।