शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

२ लाखांच्या मोबदल्यात कोटींचे स्वप्न; नीट चालताही न येणाऱ्या भोंदू बाबाने तिघांना कारमध्येच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:12 IST

दिल्लीत एका कारमध्ये सापडलेल्या तीन मृतदेहांचे गूढ अखेर समोर आलं आहे.

Delhi Crime: दिल्लीतील पीरागढी उड्डाणपुलावर एका कारमध्ये तीन जण संशयास्पद मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना दिल्लीपोलिसांनी एका शातिर भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैशांचा पाऊस पाडण्याचे आणि पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून या तांत्रिकाने तिघांचा बळी घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

रविवारी ८ तारखेला पीरागढी उड्डाणपुलावर एक पांढऱ्या रंगाची टाटा टिएगो कार बराच वेळ उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासणी केली असता, कारमध्ये रणधीर, शिव नरेश आणि लक्ष्मी देवी हे तिघे बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला ही आत्महत्या असावी असा संशय होता, पण तांत्रिक तपासात एका बाबाचे नाव समोर आले.

असा फसला तांत्रिकाचा सापळा

तपासादरम्यान पोलिसांनी कमरुद्दीन ऊर्फ बाबा याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी देवी गेल्या ३-४ महिन्यांपासून बाबाच्या संपर्कात होती. ती पतीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पहिल्यांदा बाबाकडे गेली होती. त्यावेळी बाबाने एका जुन्या जागेतून जादूने पैसे निघाल्याचा खोटा बनाव रचून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. मला २ लाख रुपये द्या, मी त्यातून तुम्हाला करोडो रुपये मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले.

लाडूमध्ये दिलं विष अन् बाबा फरार

घटनेच्या दिवशी रणधीर, शिव नरेश आणि लक्ष्मी हे तिघे २ लाख रुपये घेऊन बाबाला भेटायला गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाबा या तिघांसोबत कारमध्ये पुढील सीटवर बसलेला दिसला. बाबाने या तिघांनाही प्रसादाच्या नावाखाली लाडूमध्ये विषारी पदार्थ कालवून खायला दिला. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. तिघेही बेशुद्ध झाल्याचे पाहून बाबा कारमधून उतरला आणि पैसे घेऊन पसार झाला. गुदमरून आणि विषबाधेमुळे या तिघांचाही कारमध्येच मृत्यू झाला.

आरोपी बाबाचा गुन्हेगारी इतिहास

पोलिसांनी सांगितले की, अटक केलेला कमरुद्दीन हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही त्याने अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तो अनेक लोकांच्या संपर्कात होता आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली त्यांचे पैसे लुटत होता. पोलिसांनी आरोपीकडून काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले असून, ज्या विषारी पदार्थामुळे मृत्यू झाला, त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या प्रकरणातील अधिक माहितीसाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Baba Kills Three in Car with Poisoned Sweets for Money

Web Summary : A conman posing as a Baba lured three people with promises of wealth, poisoned them with laced sweets in a car, and stole their money near Delhi. Police arrested the Baba, who has a history of similar crimes.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस