शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

आधी मैत्री,नंतर प्रेम, शारीरिक संबंध, अल्पवयीन मुलगी प्रेगनंट; घरच्यांचा लग्नाला नकार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 18:23 IST

१७ वर्षाच्या मुलीच १५ वर्षाच्या मुलासोबत मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं.

१७ वर्षाच्या मुलीच १५ वर्षाच्या मुलासोबत मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्यात शारीरिक संबंध झाले. मुलगी प्रेगनंट झाली. या दोघांना याची माहिती झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोघेही घाबरले. दोघेही वेगवेगळ्या समाजातील आहेत. घरचे लग्नासाठी तयार होणार नाहीत याची भीती दोघांना होती. यामुळे दोघांनी शहर सोडायचा निर्णय घेतला. दोघांनी पुण्याला जाणारी ट्रेन पकडली. 

या दोघांची ट्रेनमध्ये ओळखपत्र तपासण्यात आले, यात हे दोघंही अल्पवयीन असल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर दोघांना मथुरा स्थानकावर उतरवण्यात आले. या प्रकरणाची दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली. कांजवाला पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून मुलाला अटक केली.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १७ वर्षीय मुलगी दिल्लीतील रोहिणीच्या कांझावाला भागात कुटुंबासह भाड्याने राहते. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे  आहे. मुलगी चार भावंडांमध्ये ही मुलगी मोठी आहे. आई-वडील दोघेही नोकरी करतात. मुलगीही आईसोबत काम करते. एका मित्राच्या माध्यमातून मुलीची ओळख एका १५ वर्षांच्या मुलाशी झाली. तो मुलगा उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांमध्ये जवळपास वर्षभरापासून मैत्री आहे. मुलीने त्याला तिच्या कारखान्यात नोकरीही मिळवून दिली. 

'कामाच्या ठिकाणी मुलाने लग्नासाठी प्रपोज केल्याच मुलीने पोलिसांना सांगितले. यानंतर आमच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. कारखान्यात कोण नसायचे तेव्हा दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर ती मुलगी गरोदर राहिली, याची माहिती तिने मुलाला दिली. या मुलाने कांजवाला परिसरातच भाड्याने खोली घेतली. कामाच्या निमित्ताने ती दिवसभर मुलाच्या खोलीत राहायची. मुलगा नोकरीला निघायचा. २० मार्च रोजी वडिलांनी मुलीला शिवीगाळ केली. याच निमित्तावरून ती घरातून निघून गेली. मुलगा आणि ती नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून पुण्याला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. ट्रेनमध्ये चेकिंग करताना संशय आल्यावर त्यांचे ओळखपत्र विचारले, त्यावरून हे दोघे अल्पवयीन व गर्भवती असल्याचे उघड झाले.

यानंतर या दोघांना मथुरा स्थानकात सोडण्यात आले आणि दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीचे वैद्यकीय आणि समुपदेशन केले. मुलीने पोलिसांना निवेदन दिले की ती स्वतःच्या इच्छेने नातेसंबंधात आहे आणि तिला त्या मुलाशी लग्न करायचे आहे. पोलिसांनी तपास केला असता मुलाचे वय १५ वर्षे असल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस