शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीची लोखंडी रॉडने हत्या; चोवीस तासात दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:27 IST

गुरुवारी रात्री एका महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर आता तरुणीची रॉडने हत्या करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील पॉश परिसर असलेल्या मालवीय नगरमध्ये दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे कॉलेजसमोरच एका तरुणीच्या डोक्यात रॉड मारुन हत्या करण्यात आली आहे. लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीने तरुणीवर हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी फरार आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव नरगिस असून, तिच्यावर आरोपी इरफानने रॉडने हल्ला केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांना आज दुपारी 12 च्या सुमारास अरबिंदो कॉलेजजवळ एका मुलीची हत्या केल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस तिथे गेले असता विजय मंडळ पार्कमध्ये एका मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. 

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा नरगिसच्या डोक्यातून रक्त येत होते. तिच्या मृतदेहाजवळ लोखंडी रॉडही सापडला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. रॉड फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले, चौकशीदरम्यान त्याने खुनाची कबुली दिली. 

महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वादी मालवीय यांचे ट्विट

कालही एकाची हत्यादरम्यान, दिल्लीतील डाबरी येथे गुरुवारी(27) रात्री एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आशिष असे या हत्येतील आरोपीचे नाव असून त्याने नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रेणू गोयल असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी रेणूचा मोबाईलही जप्त केला आहे. पोलीस त्याचा सीडीआर तपासत आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस