शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चोरी केलेल्या फोनवरून कॅब केली बुक; नंतर एकाच रात्री २ चालकांच्या केल्या हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 16:50 IST

Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीच्या फोनवरून कॅब बुक केली होती. त्यानंतर लुटण्याच्या उद्देशाने दोन्ही कॅबच्या चालकांची हत्या करण्यात आली. पोलीस सध्या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहेत.

दिल्लीत शुक्रवारी रात्री 2 कॅब चालकांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चोरीच्या फोनवरून कॅब बुक केली होती. त्यानंतर लुटण्याच्या उद्देशाने दोन्ही कॅबच्या चालकांची हत्या करण्यात आली. पोलीस सध्या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहेत.मध्य जिल्हा पोलिसांनी माहिती दिली की, छाविनाथ हा ओला-उबेर कॅब चालवत असे. गुरुवारी रात्री 12.30 वाजल्यानंतर अनोळखी व्यक्तीने आनंद पर्वत परिसरातून आपली कॅब बुक केली, मात्र दुपारी 1 वाजल्यापासून कुटुंबीयांना छाविनाथचा कोणताही सुगावा लागला नाही, तसेच त्यांच्या क्रमांकावर संपर्क होऊ शकला नाही.

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बळजबरी केले लैंगिक अत्याचार

मुलींचे मृतदेह कबरीतून काढून घर सजवले, कोण आहे हा 'इतिहासकार'?

दरम्यान, गुलाबीबाग पोलिसांनी हरियाणा राज्याची नंबर प्लेटची कॅब बेवारस स्थितीत जप्त केली. ही जप्ती शुक्रवारी सकाळी झाली. पोलिसांनी नंबर प्लेटच्या आधारे तपास सुरू केला असता, छाविनाथच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता ही कॅब छाविनाथची असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, भारत नगर परिसरातील एका नाल्यातून छाविनाथचा मृतदेहही सापडला आहे.

त्याच दिवशी आनंद पर्वत परिसरात अनिल यादव नावाच्या ड्रायव्हरचाही मृतदेह कॅबमध्ये सापडला होता. या दोन्ही केसेस सारख्याच होत्या. त्यामुळे मध्य जिल्हा पोलिसांनी आकाश आणि जुनैद या दोन चोरट्यांना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पाळत ठेवून अटक केली. त्यांच्यासह आणखी सूत्रधार प्रीतमचा पोलिस शोध घेत आहेत. चौकशीत या लोकांनी चोरीच्या मोबाईलवरून कॅब बुक केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा हेतू लुटमारीचा होता, त्यानंतर कॅब चालकाची हत्या करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्लीRobberyचोरीMobileमोबाइलDeathमृत्यू