VIDEO: भररस्त्यात पँट काढून तरुणाला बेल्टनं मारहाण; पैसे, मोबाईल घेऊन भामटे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 18:10 IST2021-07-11T18:10:00+5:302021-07-11T18:10:14+5:30

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; पोलिसांकडून तिघांना अटक

delhi miscreants took off pant of youth looted him incident caught on cctv | VIDEO: भररस्त्यात पँट काढून तरुणाला बेल्टनं मारहाण; पैसे, मोबाईल घेऊन भामटे फरार

VIDEO: भररस्त्यात पँट काढून तरुणाला बेल्टनं मारहाण; पैसे, मोबाईल घेऊन भामटे फरार

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पश्चिम दिल्लीतील रघुबीर नगर परिसरात लुटमारीची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. स्कूटीवरून आलेल्या भामट्यांनी एका तरुणाची पँट काढून त्याची झडती घेतली. त्यानंतर भामट्यांनी तरुणाला मारहाण केली. पीडित तरुणानं या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

स्कूटीवरून जात असलेल्या भामट्यांनी आधी एका वाटसरूला मारहाण केली. त्यानंतर त्याची झडती सुरू केली. भामट्यांनी तरुणाची पँट काढली. त्यामध्ये असलेला पैसे आणि मोबाईल भामट्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर पीडित तरुणाला आरोपींनी त्याच्याच बेल्टनं मारहाण केली.

पेशानं चालक असलेल्या पीडित तरुणानं रघुवीर नगर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. आरोपींनी पँट काढून मारहाण केल्याचं आणि लूटमार केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. यानंतर पोलिसांनी लखविंदर, दीपक आणि आकाशला अटक केली. लूटमार केलेलं सामान त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं आहे.

Web Title: delhi miscreants took off pant of youth looted him incident caught on cctv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.