शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

दुर्दैवी! आयुष्यातील संघर्षला वैतागला; पत्नी अन् २ मुलांची हत्या करून स्वत:चं जीवनही संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 09:31 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे, यात धीरजने जीवनात काहीच उरलं नाही, तर भविष्यही अंधारात असल्याचं म्हटलं आहे

ठळक मुद्दे छोट्या मुलाची आयुष्यभर सेवा करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे धीरज चिंतेत होता. माझा मुलगा परिस्थितीचा सामना करू शकला नाही आणि आता सगळं काही संपलंपोलिसांनी दरवाजा तोडून आत गेले असता पत्नी आरतीचा मृतदेह रक्त्ताच्या थारोळ्यात आढळला

नवी दिल्ली – रोहिणी नॉर्थच्या नाहरपूर गावात पत्नी आणि दोन चिमुकल्यांची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतकांमध्ये धीरज यादव(29), पत्नी आरती यादव(28), मुलगा हितेन(6) आणि अथर्व(3) समावेश आहे, पोलीस चौकशीत धीरजचा मोठा मुलगा बोलू शकत नव्हता तर छोटा मुलगाही दिव्यांग आहे, आईची मानसिक स्थिती ठिक नाही, याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत असे, पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये धीरज जीवनाला कंटाळला असल्याचं उल्लेख आहे, पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे, यात धीरजने जीवनात काहीच उरलं नाही, तर भविष्यही अंधारात असल्याचं म्हटलं आहे, धीरजचे वडील महासिंह यांनी सांगितलं की, त्यांचे दोन्ही नातू दिव्यांग होते, छोट्या मुलाची आयुष्यभर सेवा करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, त्यामुळे धीरज चिंतेत होता. माझा मुलगा परिस्थितीचा सामना करू शकला नाही आणि आता सगळं काही संपलं असं महासिंह म्हणाले.

डीसीपी प्रणव तायल यांनी सांगितले की, महासिंहचं कुटुंब रोहिणीच्या नाहरपूर येथे राहते, ३ मजली इमारतीत तळाला महासिंह आणि त्यांच्या पत्नी सुदेश रानी आणि आई राहत होती, त्यांचा मोठा मुलगा नीरज पत्नी आणि दोन मुलांसह पहिल्या मजल्यावर राहायला आहे, तो बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, दुसऱ्या मजल्यावर धीरजचं कुटुंब राहत होतं, तो कंत्राटी गाडी चालक होता, गुरुवारी सकाळी पोलिसांना ही घटना समजली.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत गेले असता पत्नी आरतीचा मृतदेह रक्त्ताच्या थारोळ्यात आढळला, हितेन आणि अथर्वही मृत अवस्थेत आढळले, धीरजचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. प्राथमिक अंदाजात धीरजने पत्नी आणि २ मुलांची हत्या करून गळफास घेतल्याचा संशय आहे, रुममध्ये एक चाकूही जप्त करण्यात आला. सुसाईड नोट आढळली, त्यात धीरज जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं. धीरजचे वडील महासिंह लष्करातून निवृत्त झाले आहेत, त्यांनी दोन्ही नातवंडावर लाखो रुपये उपचारासाठी खर्च केल्याचं म्हटलं. परंतु लहान मुलगा ठिक होणार नसल्याची चिंता धीरजला सतावत होती, त्यामुळे दोघा नवरा-बायकोमध्ये भांडणं व्हायची.

टीप – जर तुमच्या परिचयातील कोणीही मानसिकदृष्या तणावाखाली असेल तर नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँन्ड न्यूरो सायन्सशी संपर्क साधावा, याठिकाणी कॉल करून तुमची समस्या सांगू शकता, येथील डॉक्टर योग्य तो सल्ला देऊन यातून बाहेर काढतील, हेल्पलाईन नंबर – 08046110007

टॅग्स :Policeपोलिस