शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंधविश्वासाचा कहर! सद्दाम हुसैनच्या आयडियाने सासरच्यांना दिलं विष; सासू-मेहुणीचा मृत्यू, पत्नी कोमात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:15 IST

दिल्लीच्या इंद्रपुरी परीसरातील एका जावयाने आपल्या सासरच्या लोकांना माशातून थेलिअम नावाचं स्लो पॉयजन दिलं. ज्यामुळे त्याच्या सासूचा आणि मेहुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अंधविश्वासातून निर्माण झालेल्या नाराजीमुळे एका आनंदी परिवाराला कसं उद्ध्वस्त केलं याचं उदाहरण सांगणारी एक घटना समोर आली आहे. एका हाय प्रोफाइल परिवार कशाप्रकारे अंधविश्वासाचा शिकार झाला हे यातून दिसून येतं. दिल्ली घडलेल्या या घटनेमुळे देशातील जनता विचारात पडली आहे. 

सासू, मेहुणी अन् पत्नीची हत्या

दिल्लीच्या इंद्रपुरी परीसरातील एका जावयाने आपल्या सासरच्या लोकांना माशातून थेलिअम नावाचं स्लो पॉयजन दिलं. ज्यामुळे त्याच्या सासूचा आणि मेहुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याची पत्नी २६ दिवसांपासून कोमात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दिल्लीत राहणाऱ्या या जावयाने या प्लॅनची प्रेरणा इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैनकडून घेतली. या कृत्याचं कारण वाचून तर तुम्ही आणखी हैराण व्हाल. पुर्जजन्माचा अंधविश्वास या कृत्याचं कारण आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अशात हॉस्पिटलमध्ये जीवनाशी लढत असलेल्या त्याच्या पत्नीचा जीव वाचेल की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.  (हे पण वाचा : धक्कादायक! गर्लफ्रेन्डने घरी बोलवून बॉयफ्रेन्डवर केला Acid Attack, उपचारादरम्यान मृत्यू....)

गुगलवरून काढली होती माहिती

आरोपी वरूणने गुगलवर , 'How To Kill Person With Slow Poison असं सर्च केलं होतं. त्यानंतर त्याने थेलिअम नावाचं स्लो पॉयजनबाबत वाचलं. सद्दाम हुसैन आपल्या विरोधकांना  मारण्यासाठी थेलिअमचा वापर करत होता. वरूणने पोलिसांना सांगितले की, त्याने हे विष २२ हजार रूपयाला खरेदी केलं होतं.

काय झालं त्या दिवशी?

आरोपी वरूण अरोराने ३१ जानेवारीला  सासरच्या सर्वांना हे विष दिलं होतं. हे त्याने माशात मिक्स करून दिलं होतं. हे विष सासरच्या लोकांच्या शरीरात गेल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. सर्वांचे केस गळू लागले होते आणि शरीर सुन्न पडू लागलं होत. त्यांची विचार करण्याची क्षमता गेली होती. (हे पण वाचा : गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी)

वरूण डोक्यात सासरच्या लोकांना संपवण्याचं खूळ इतकं भरलं होतं की, त्याने सासू-सासरे आणि पत्नीला  मासे खाऊ घातल्यानंतर आपल्या मेहुणीची बराच वेळ वाट बघितली. नंतर आपल्या डोळ्यासमोर त्याने तिला विष असलेले मासे खाऊ घातले नंतरच तो घरातून बाहेर पडला.

सासू आणि मेहुणीचा मृत्यू

थेलिअम नावाचं स्लो पॉयजन खाल्ल्याने वरूणची पत्नी दिव्या कोमात गेली. तर विषामुळे १५ दिवसांनी दिव्याची लहान बहीण प्रियांकाचा १५ फेब्रुवारीला मृत्यू झाला आणि त्यानंतर २१ मार्चला वरूणची सासू अनिता शर्मा यांचं निधन झालं.

सासरच्या लोकांवर का होता नाराज?

प्रश्न हा आहे की, वरूणने पत्नीसहीत सासरच्या लोकांनी विष देऊन मारण्याचा प्लॅन का केला? यामागे वरूण आणि त्याच्या परिवाराची अंधविश्वासाची कहाणी आहे. वरूण आणि दिव्याला IVF च्या माध्यमातून २ अपत्ये होती. यानंतर दिव्या नैसर्गिक पद्धतीने गर्भवती झाली. पण डॉक्टर म्हणाले की, तिने जर बाळाला जन्म दिला तर तिच्या जीवाला धोखा आहे.

मात्र, वरूणच्या परिवाराला बाळ हवं होतं. कारण त्यांचा अंधविश्वास होता की, या बाळाच्या माध्यमातून वरूणचे वडील पुनर्जन्म घेणार आहे. पण तिसऱ्या बाळाला जन्म दिल्याने जीवाला असणारा धोका बघता दिव्याने अबॉर्शन केलं. याचाच राग मनात घेऊन वरूणने सासरच्या सर्व लोकांची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, वरूण अरोराकडे कशाचीही कमी नव्हती. त्याला केवळ भाड्याचे महिन्याला ४ लाख रूपयांपेक्षा जास्त मिळत होते. पण अंधविश्वासामुळे त्याचा रागाचा पारा चढला. त्याच्या या रागाने परिवार उद्ध्वस्त झाला. त्याचं सासर संपलं आणि दोन चिमुकल्यांची जीवन बेवारस केलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली