शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Acid Attack: अ‍ॅसिड हल्ला: मुलीचा चेहरा पूर्ण जळाला असता; दुकानदारानं ट्रीक वापरली, म्हणून वाचली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 13:33 IST

दिल्लीतील द्वारका येथील अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीतील द्वारका येथील अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. नराधमांनी मुलीला आयुष्यभर वेदना देण्याचा प्रयत्न केला, परंतु घटनास्थळावर उपस्थित असलेल्या एखा देवदूतामुळे मुलीच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना मोठी इजा झाली नाही. मुलीच्या तोंडावर आणि मानेवर तातडीनं पाणी टाकलं नसतं तर पीडित मुलीची प्रकृती खूप बिघडू शकली असती. घटनास्थळी काही अंतरावरच असलेल्या दुकानदाराच्या सतर्कतेमुळे मुलगी फक्त ८ टक्के भाजली. दुकानदारानं सांगितलं की त्यानं पीडितेला व्हिवळताना पाहिलं आणि लगेच धाव घेत तिच्या चेहऱ्यावर बादलीभर पाणी ओतलं होतं.

दुकानदार ठरला देवदूतघटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानदाराने सांगितलं की, ती मुलगी धावतच त्याच्याजवळ आली होती. ती किंचाळत होती, जसा की एकादा माणूस आगीत पेट घेतो अशा वेदना तिला होत होत्या. ती खूप घाबरली होती. मला दिसलं की कुणीतरी तिच्यावर अ‍ॅसिड फेकून पळालं आहे. पटकन बादली भर पाणी आणलं आणि तिच्या चेहऱ्यावर ओतलं. तेव्हा ती थोडी शांत झाली होती. पण खूपच अ‍ॅसिड फेकलं गेलं होतं. 

मुलीच्या डोळ्यावर अ‍ॅसिडचा परिणामसफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे पण तिच्या डोळ्यावर अ‍ॅसिडचा परिणाम झाला आहे. रुग्णालयातील डोळ्याचे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. दिलासादायक बाब अशी की पीडिता केवळ ८ टक्के भाजली आहे. हे प्रमाण अधिक असतं तर मोठी अडचण ठरली असती. कारण अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी लागीपेक्षाही अधिक तीव्र आणि धोकादायक मानली जाते. 

पीडिता जबाब देण्याच्या अवस्थेत नाहीद्वारकाचे सब डीविजनचे एसडीएस विनय कुमार मोंगिया यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी पीडितेची तिच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत भेट घेतली. यावेळी पीडिताचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण पीडिता सध्या आयसीयूमध्ये आहे आणि ती जबाब देण्याच्या परिस्थितीत सध्या नाही. तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी काही काही दिवस लागतील असंही ते म्हणाले. त्यानंतरच तिचा जबाब नोंदवता येईल. 

पीडितेच्या चेहऱ्यावर काळे डागकुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचा चेहरा एका बाजूनं काळा पडला आहे. एका दुकानदारानं पीडितेच्या चेहऱ्यावर तातडीनं पाणी टाकलं होतं म्हणून तिचा चेहरा पूर्णपणे जळाला नाही. सध्या पीडितेच्या गळ्याकडील भाग सर्वाधिक जळाल्याचं सांगण्यात येत आहे. तर हल्ल्यामुळे आलेली सूज अजूनही कायम आहे. तोंड आणि ओठाला सूज असल्यानं तिला बोलताना अडचण येत आहे. त्यामुळे ती फक्त हो आणि नाही इतकीच प्रतिक्रिया देत आहे. 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी