शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 4 वर्षीय चिमुकलीवर 34 वर्षीय नराधमाचा अत्याचार; परिसरात तणाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 19:29 IST

या घटनेनंतर संतत्प नागरिकांनी आरोपीच्या घराचा घेराव घातला आणि पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली.

Delhi Crime: पूर्व दिल्लीतून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कोचिंग सेंटरमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाला आहे. आरोपी नराधम ट्युशन देणाऱ्या शिक्षिकेचा भाऊ असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक घटनेनतंर चिमुकलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. शेकडोच्या संख्येने आरोपीच्या घराबाहेर जमले, गाडीची तोडफोड केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्व दिल्लीतील पांडव नगरमध्ये घडली. याच परिसरात राहणारी एक मुलगी लहान मुलांची ट्युशन घ्यायची. तिच्या ट्युशनमध्ये चार वर्षांची पीडित चिमुकली यायची. काल (दि.23) ट्युशन देणारी मुलगी घरात हजर नसताना 34 वर्षीय आरोपीने त्या निष्पाप मुलीला शिकवण्याच्या बहाण्याने घरात घेतले आणि तिच्यावर तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली.

घटनेनंतर मुलगी रडत-रडत घरी पोहोचली. तिच्या घरच्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता ती आणखीनच रडू लागली. पालकांनी तिची समजूनत काढली आणि तिला जवळ घेऊन विचारले असता, तिने तिच्यावर घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. यानंतर पालकांनी मुलीला घेऊन थेट मांडवली पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

दुसरीकडे चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. आज सकाळपासून नागरिक रस्त्यावर उतरले असून, आरोपीवर कडक कारवाईची मागणी करत आहेत. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची कारही फोडली. सध्या मुलीला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी उप-राज्यपालांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिस