अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास अटक; मीरा रोड पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:26 AM2020-08-24T01:26:23+5:302020-08-24T01:26:28+5:30

मुख्य भूमिकेचे दाखवले होते आमिष

Delhi boyfriend arrested in actress' suicide case; Mira Road police action | अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास अटक; मीरा रोड पोलिसांची कारवाई

अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीतील प्रियकरास अटक; मीरा रोड पोलिसांची कारवाई

Next

मीरा रोड : मीरा रोडमध्ये राहणाऱ्या सेजल शर्मा या मालिका व जाहिरातीत काम करणाºया अभिनेत्रीने जानेवारीत केलेल्या आत्महत्येप्रकरणी दिल्लीत राहणाºया प्रियकरास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. आपल्याकडे अद्भुत शक्ती असून तिचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मीरा रोडच्या शिवार उद्यान परिसरातील रॉयल नेस्ट इमारतीच्या दुसºया मजल्यावर राहणाºया सेजल शर्मा (२४) हिने २४ जानेवारी रोजी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दिल्लीतील तिचा प्रियकर आदित्य वशिष्ठ (३०) यानेच पोलिसांना फोन करून सेजलने आत्महत्या करणार असल्याचे सांगितल्याचे कळवले होते. पहाटे पोलिसांनी सेजलच्या घरी धाव घेतली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कुणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते. परंतु, सेजलच्या आईने पोलिसांना तक्रार करून आदित्य आणि सेजलमध्ये भांडणे होत असल्याचे सांगितले होते. सेजल आत्महत्या प्रकरणाचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम व मीरा रोड पोलिसांनी केला.

Web Title: Delhi boyfriend arrested in actress' suicide case; Mira Road police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.