Delhi Assembly Speaker RamNiwas Goel send to jail | दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना कारावास

दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना कारावास

ठळक मुद्देया निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे रामनिवास गोयल यांनी सांगितले.२०१५ मध्ये एका व्यक्तीला घरात घुसून मारहाण करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नवी दिल्लीदिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांना येथील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये एका व्यक्तीला घरात घुसून मारहाण करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी गोयल यांना अवधी देण्यात आला आहे. १० हजार रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूरही झाला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे रामनिवास गोयल यांनी सांगितले.

Web Title: Delhi Assembly Speaker RamNiwas Goel send to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.