शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

देहूरोड पोलिसांनी केल्या सराईत गुन्हेगारांकडून चोरीच्या आठ दुचाकी जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 19:08 IST

देहूरोड ,रावेत ,भोसरी  पोलीस ठाणे हद्दीतील एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी तिघा चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत.

देहूरोड : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांकडून देहूरोड पोलिसांनी अडीच लाख किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील एका फरार गुन्हेगाराचा शोध घेत आहेत .  अक्षय राजू शेळके ( वय ३३ , रा. सोमाटणे फाटा ,ता. मावळ ), कार्तिक लक्ष्मण आढे (  वय १९ , रा.चौराई नगर ,सोमाटणे फाटा,  ता. मावळ ) आणि  सनी मनोज रॉय ( वय १९ , रा .थॉमस कॉलनी ,देहूरोड  ) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे असून सराईत गुन्हेगार सादिक शेख ( रा.साईनगर ,मामुर्डी ) हा फरार आहे .  देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस कर्मचारी संकेत घारे व  किशोर परदेशी यांना त्यांच्या खबऱ्याकडून मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त आर .के .पद्मनाभन, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील , देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर व  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस निरीक्षक पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार ,पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप ,सहायक फौजदार सुभाष सावंत, पोलीस हवालदार प्रमोद सात्रस ,पोलीस कर्मचारी परदेशी ,घारे ,सचिन शेजाळ, अनिल जगताप ,नारायण तेलंग आदींनी सापळा रचुन अक्षय ,कार्तिक आणि सनी असे तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली आहे. यात देहूरोड ,रावेत ,भोसरी  पोलीस ठाणे हद्दीतील एकूण अडीच लाख रुपये किमतीच्या  आठ दुचाकी तिघा चोरट्यांकडून जप्त केल्या आहेत.यापैकी ३ देहूरोड पोलीस ठाणे व १ दुचाकी भोसरी पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने चार गुन्हे उघडकीस आले आहेत. या तिघांचा साथीदार शेख अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .मंदिरातील दानपेटी चोरणे, दुचाकी चोरणे ,हाणामाऱ्या असे गुन्हे त्यावर दाखल आहेत. अधिक तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता  असल्याचे  पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी