शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रक्षक बनला भक्षक! प्रियकराला सोडण्यासाठी पोलिसाचा प्रेयसीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 17:32 IST

रांजणोली नाक्यावर बोलावले आणि त्यासमोर असलेल्या कल्याण गेस्ट हाऊस या लॉजवर नेऊन बलात्कार केला असाही आरोप या तरूणीने केला आहे. रोहन गोंजारींवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही या पीडित तरूणीने नमूद केले आहे. 

ठळक मुद्देसतीश नक्कलवार हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. हे माहिती असूनही या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. पेयातून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर सलीम नावाच्या तरूणाकडून बलात्कार करतानाचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले तुझ्या प्रियकराला सोडवायचं असेल तर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव असं सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोप या तरूणीने केला आहे

भिवंडी - प्रियकरावर दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरूणीने केला आहे. या प्रकरणी पीडित तरूणीने भिवंडीतील कोन गाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस उप निरीक्षक रोहन गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 

पीडित तरूणी मुंबईत राहणारी आहे. तरुणीची काकू भिवंडीत राहते. पीडित तरूणी काकूच्या घरी सुट्टीत जात असे. त्यावेळी सतीश नक्कलवार नावाच्या तरूणाशी तिचे प्रेम जुळलं. २०१५ पासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. सतीश नक्कलवार हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. हे माहिती असूनही या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. या दोघांचे प्रेमप्रकरण आहे याची कुणकुण सतीशची पहिल्या प्रेयसीला लागली. तिने पीडित तरूणीला फोन करून सतीशचे आणि तिचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. तसेच सतीशचा नाद सोड अशी धमकी दिली. तरीही ही तरूणी सतीशला भेटत राहिली. तसेच या दोघांमध्ये शरीरसंबंधही झाले. ही गोष्ट पहिल्या प्रेयसीला कळाली. नंतर पहिल्या प्रेयसीनं सतीशला मुंबईत राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. नाहीतर घरच्यांना सगळे प्रकरण सांगेन अशीही धमकी तिने दिली. त्यानंतर पहिली प्रेयसी आणि सतीशचं भांडण झालं आणि तू माझ्या घरी येऊ नकोस तसंच माझ्याशी कोणतंही नातं ठेवू नको असंही सतीशला तिने बजावले. मात्र, सतीशला असे सांगितल्यानंतर मी तुझ्या घरी येऊन सगळं प्रकरण सांगेन अशी धमकी त्याने तिला दिली. .

दरम्यान मुंबईत राहणाऱ्या प्रेयसीला सतीशने घरी बोलावलं. पेयातून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर सलीम नावाच्या तरूणाकडून बलात्कार करतानाचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. दुसऱ्या दिवशी प्रेयसीला  हा व्हिडीओ दाखवला आणि ब्लॅकमेल करत ५० हजार रुपयांची मागणी केली. घाबरून पीडित तरूणीने तिला ४३ हजार रुपये दिली. तरीही धमक्या येणे सुरुच होते. त्यामुळे पीडित तरूणीने कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पहिली प्रेयसी, सतीश आणि सलीम या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र बलात्काराच्या घटनेला या तरूणीनेच जबाब बदलून या घटनेला वेगळे वळण लावले आहे. सतीश हा माझा प्रियकर असून मी त्याच्याशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले असल्याचे या तरूणीने सांगितले. सतीशवरचा बलात्काराचा गुन्हा मागे घ्या असा तगादा तिने भिवंडी पोलिसांकडे लावला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीनगर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांना गजाआड केले. पीडित तरूणीने कोर्टासमोरही सतीशने बलात्कार केला नाही तर त्याच्याशी सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले. याच गुन्ह्याचे  तपास अधिकारी रोहन गोंजारी यांनी खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कारवाई करणार असल्याचे पीडित तरूणीला धमकावले. तसेच तुझ्या प्रियकराला सोडवायचं असेल तर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव असं सांगून ब्लॅकमेल केल्याचा आरोप या तरूणीने केला आहे. तसेच पोलीस उप निरीक्षक रोहन गोंजारी यांनी आपल्याला रांजणोली नाक्यावर बोलावले आणि त्यासमोर असलेल्या कल्याण गेस्ट हाऊस या लॉजवर नेऊन बलात्कार केला असाही आरोप या तरूणीने केला आहे. रोहन गोंजारींवर कठोर कारवाई करण्यात यावी असेही या पीडित तरूणीने नमूद केले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPoliceपोलिसBhiwandiभिवंडी