शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तनुश्री दत्ताविरोधात २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 18:08 IST

नाना पाटेकर यांची सामाजिक संस्था असलेल्या नाम फाऊंडेशनविरोधात आरोप करू नये अशी न्यायालयाने कानउघडणी केली आहे.

ठळक मुद्देअलीकडेच तनुश्रीने पत्रकार परिषदांमध्ये नाम फाऊंडेशनविरोधातही टीका केली होती.न्यायमूर्तींनी तनुश्रीला या संस्थेची बदनामी होईल अशी वादग्रस्त विधाने करू नये असे निर्देश दिले आहेत.

मुंबई - गेल्या वर्षी MeToo मोहिमेंतर्गत अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तनुश्री दत्तालामुंबई उच्च न्यायालयाने समजावले आहे. नाना पाटेकर यांची सामाजिक संस्था असलेल्या नाम फाऊंडेशनविरोधात आरोप करू नये अशी न्यायालयाने कानउघडणी केली आहे. या संस्थेने तनुश्री दत्ताविरोधात तब्ब्ल २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अलीकडेच तनुश्रीने पत्रकार परिषदांमध्ये नाम फाऊंडेशनविरोधातही टीका केली होती.याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तनुश्रीची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात तिचे वकीलही उपस्थित नव्हते. यामुळे नाना पाटेकर यांच्या संस्थेला काहीसा दिलासा देत असताना न्यायमूर्तींनी तनुश्रीला या संस्थेची बदनामी होईल अशी वादग्रस्त विधाने करू नये असे निर्देश दिले आहेत. तनुश्रीने नाम फाऊंडेशनच्या प्रतिमेला बाधा पोहचेल अशी वक्तव्ये करू नये असं न्यायालयाने बजावलं आहे.काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनवरही गंभीर आरोप केले होते. नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने परदेशातून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या घेतल्या. मात्र, हा सर्व पैसा कुठे जातो? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचे की यांचे काम झाले. ते कोल्हापूर पूरग्रस्तांना ५०० घरे देणार होते, त्याचे काय झाले?, असा सवालही यावेळी तनुश्री दत्ताने उपस्थित केला होता.  ‘नाम’ ही संस्था नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी २०१५ साली सुरु केली होती. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ही संस्था काम करते आहे. जानेवारी २०२० मध्ये तनुश्रीने एक पत्रकार परिषद घेऊन या संस्थेवर आरोप केले होते. या आरोपांमुळे संस्थेची बरीच बदनामी झाल्याचे या संस्थेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू; तनुश्री दत्ताची जळजळीत टीका

 

मोगुलमध्ये काम करण्याच्या आमिर खानच्या निर्णयावर भडकली तनुश्री दत्ता, सुनावले खडे बोल

 

Breaking : तनुश्री दत्ता, नाना पाटेकर प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

टॅग्स :Tanushree Duttaतनुश्री दत्ताNana Patekarनाना पाटेकरHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई