शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पीएसआय परीक्षेसाठी पात्र ठरविलेल्या ‘त्या’उमेदवारांचा निर्णय प्रलंबितच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 21:02 IST

राज्य सरकारकडून निर्णय होत नसल्याने न्यायालयात धाव घेतली असताना त्याठिकाणी ‘तारीख पे तारीख’च्या चक्रात ते अडकले आहेत.

ठळक मुद्दे२०११ व २०१३ या परीक्षेतून पात्र ठरलेल्या खूल्या प्रवर्गातील ११९ उमेदवारांची ही व्यथा आहे. मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे आपल्याला कोणी वाली नसल्याने गृह विभागाकडून त्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली आहे, असा आक्षेप संबंधित उमेदवारांकडून घेण्यात येत आहे. 

मुंबई - त्यांच्याबरोबर उपनिरीक्षक पदाची परीक्षा देवून पात्र ठरलेले उमेदवार प्रशिक्षण देवून अधिकारी म्हणून रुजू झालेतरी त्यांच्या वाटेला मात्र अद्याप प्रतिक्षाच आहे. राज्य सरकारकडून निर्णय होत नसल्याने न्यायालयात धाव घेतली असताना त्याठिकाणी ‘तारीख पे तारीख’च्या चक्रात ते अडकले आहेत.२०११ व २०१३ या परीक्षेतून पात्र ठरलेल्या खूल्या प्रवर्गातील ११९ उमेदवारांची ही व्यथा आहे. पदोन्नतीतील आरक्षणाला छेद देत गुणवत्तेच्या आधारावर पीएसआयच्या प्रशिक्षणासाठी निवड होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र सामान्य प्रशासन व गृह विभाग यांच्यातील समन्वयाअभावी त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधीकरणाच्या (मॅट) मध्ये सुरु असलेली याचिका अंतिम निर्णयाअभावी प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.राज्य लोकसेवा आयोगातर्फे खात्यातर्गत उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेतून गुणवत्तेवर पात्र ठरलेले पीएसआयच्या ११५ बॅँचचे १५२ उमेदवारांचा बुधवारी संचलन सोहळा झाला. बहुतांश उमेदवारांना वर्षभरासाठी त्यांच्या मूळ पोलीस म्हणून भरती झालेल्या घटकामध्ये पर्यवेक्षणार्थी पीएसआय म्हणून नियुक्ती देण्यात आल्या आहेत.आयोगातर्फे २०११ व २०१३ मध्ये अनुक्रमे ७७५ व १६४ पदाची परीक्षा झाली होती. त्यासाठी जाहिरात दिलेली पदे भरण्यात आली असलीतरी दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल विजय घोगरे यांच्या याचिकेवर पदोन्नतीवरील आरक्षण हे घटनाबाह्य असल्याचा निकाल देण्यात आला. त्यामध्ये आरक्षणाच्या कोट्यातून दिलेल्या नियुक्ती अवैध ठरवित त्याच परीक्षेत खूल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार करण्याचे आदेश देण्यात आले. त्याच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारला काही कालावधी देण्यात आल्यानंतर एका टप्यात काही उमेदवारांना परीक्षेत उर्तीण ठरवून प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. मात्र अद्याप त्यातील ११९ उमेदवार प्रलंबित असून त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात गृह व सामान्य विभाग परस्पराकडे बोट करीत आहे. याप्रकरणी ‘मॅट’मध्ये दाखल असलेल्या खटल्यावर ३,४ जानेवारीला सलगपणे सुनावणी झाली. मात्र सोमवारी निकाल होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना त्याबाबतचा निकाल अनिश्चित काळापर्यत प्रलबिंत ठेवण्यात आला. दरम्यान २०१६मध्ये झालेल्या मर्यादित परीक्षेतील सर्व उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र तरीही त्यापूर्वी परीक्षा दिलेल्या पोलिसांच्याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला आहे. मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे आपल्याला कोणी वाली नसल्याने गृह विभागाकडून त्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली आहे, असा आक्षेप संबंधित उमेदवारांकडून घेण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारMPSC examएमपीएससी परीक्षा