कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:47 IST2020-12-20T00:46:50+5:302020-12-20T00:47:18+5:30

suicide : अभिषेक माहे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारावे परिसरात राहणारा आहे. शनिवारी सकाळी दारावे येथील तलावात उडी मारून त्याने आत्महत्या केली.

Debt-ridden youth commits suicide | कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

नवी मुंबई : कर्जाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दारावे येथे घडली आहे. सदर घटनेची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
अभिषेक माहे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारावे परिसरात राहणारा आहे. शनिवारी सकाळी दारावे येथील तलावात उडी मारून त्याने आत्महत्या केली. हा प्रकार काही व्यक्तींनी पाहिला असता, त्यांनी अग्निशमन दलाला कळविले होते. मात्र, पाण्यात शोध घेऊनही तो लागला नव्हता. 
अखेर काही तासांनी त्याचा मृतदेह तलावात आढळून आला. अग्निशमन दलाने सदर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. चौकशीदरम्यान पोलिसांना त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी हाती लागली आहे. त्यात कर्जाला व कर्जवसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे  नमूद  केले आहे.  त्यानुसार, नेरुळ पोलीस ठाण्यात नोंद 
करण्यात आली आहे. याप्रकरणी  अधिक  तपास सुरू  असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Debt-ridden youth commits suicide