शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

आस्ट्रेलियाहून आलेल्या तरुणाचा मृत्यू ट्रॅक्टर अपघातामुळेच;पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट 

By पूनम अपराज | Published: January 27, 2021 7:37 PM

Farmers Tractor Rally : ट्रॅक्टर अपघातात जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचं २६ वर्षीय व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अविनाश चंद्र यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केले आहे की, त्याला गोळी लागलेला नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर पलटल्यानंतर त्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे मृत्यू झाल्याचं श

लखनऊ - गेल्या ७० दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशाच्या प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चवेळी दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार झाला. पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. ट्रॅक्टर रॅलीला लागलेल्या हिंसक वळणामुळे एका तरुणाचा नाहक मृत्यू झाला. मात्र, काल झालेल्या हिंसाचार प्रकरणातील ट्रॅक्टर रॅलीत सामील झालेल्या उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा दिल्लीच्या आयटीओ भागात मृत्यू झाला होता, तर मृत्यू गोळीबारात झालेला नाही असा आंदोलनात सामील झालेल्या काही आंदोलकांनी काल दावा केला, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी आज सांगितले. ट्रॅक्टर अपघातात जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचं २६ वर्षीय व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.

दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांवर केला गुन्हा दाखल  

 

उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अविनाश चंद्र यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “शवविच्छेदन अहवालात स्पष्ट केले आहे की, त्याला गोळी लागलेला नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर पलटल्यानंतर त्याला झालेल्या गंभीर जखमेमुळे मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनानंतर उघडकीस आले आहे. काल प्रसिद्ध झालेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांच्या दिशेने निळा ट्रॅक्टर चालवणारा व्यक्ती पोलिसांच्या बॅरिकेट्सच्या दिशेने ट्रॅक्टर येताना दिसत होता,त्यामुळे पोलिसांना अडथळा निर्माण झाला होता. वेगाने येणारा ट्रॅक्टर दोरखंड, बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. काल अपघातग्रस्त जखमांमुळेच व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते, तर काही आंदोलकांनी दावा केला होता की गोळ्या घालून ठार केले आहे.

राष्ट्रीय राजधानीपासून १८० कि.मी. अंतरावर रामपूर येथील नवरित सिंग असे या मृत व्यक्तीचे नाव असून नुकतेच तो ऑस्ट्रेलिया येथून मूळ गावी परत आला होता. तेथे त्यांची पत्नी विद्यार्थिनी आहे. मंगळवारी तो तीन केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात सामील झाले होता. एका शेजाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, “आम्ही परेडमध्ये सहभाग घेण्यासाठी एकत्र आलो होतो, पण हे कधी घडले हे मला माहित नव्हते.”हे तीन कायदे रद्द करावे या मागणीसाठी 40 शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. संघटनांनी मान्य केल्याप्रमाणे ही रॅली सकाळी ११ वाजता सुरू होणार होती आणि दिल्लीच्या सीमेवरुन जाणार होती. ट्रॅक्टर व इतर वाहनांवरील हजारो शेतकर्‍यांनी सकाळी 8 वाजेपर्यंत अनियोजित मार्गांद्वारे राजधानीत घुसखोरी सुरू केली, बॅरिकेड्स खाली पाडले आणि पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूFarmerशेतकरीdelhiदिल्ली