वीजेचा ‘शॉक’ लागून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 16:55 IST2017-09-11T16:55:21+5:302017-09-11T16:55:56+5:30

मंदिराला रंग देतांना घटना : १ जण जखमी

The death of two people, including the 'shock' of electricity | वीजेचा ‘शॉक’ लागून दोघांचा मृत्यू

वीजेचा ‘शॉक’ लागून दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देघटनेत नितीन (मेजर) हे जखमी झाले़या घटनेनंतर लागलीच वीजपुरवठा खंडीत करून तरूणांना रूग्णालयात नेण्यात आले़ त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले़ या घटनेनंतर संबंधित दोन्ही तरूण राहत असलेल्या जमनागिरी रोडवरील त्यांच्या घराजवळ गर्दी झाली होती़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चितोड रोडवर असलेल्या रंगारी चाळ परिसरात मंदिराला रंग देत असतांना उच्च दाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला़ तर एक जण जखमी झाला़ 
शहरातील चितोड रोडवर रंगारी चाळीजवळ श्री चिंचणी मायाक्का मंदिर आहे़ या मंदिराला नवरात्रीनिमित्त रंग देण्याचे काम सुरू होते़ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मंदिराला रंग देत असतांना मंदिरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला रंग देणाºया तरूणांचा स्पर्श झाला़ या घटनेत गोरख पांडूरंग बोरसे (वय २५) आणि बादल नामदेव मोरे (वय १९) दोघे रा़ जमनागिरी रोड, धुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला़

Web Title: The death of two people, including the 'shock' of electricity