शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:52 IST

रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचा मृतदेह देण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांकडून बिलाची मोठी रक्कम मागितली.

पंजाब जालंधरच्या लाजपत नगर परिसरात राम न्यूरो सेंटर रुग्णालयामध्ये रात्री उशीरा मोठा गोंधळ झाला. कारण रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचा मृतदेह देण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांकडून बिलाची मोठी रक्कम मागितली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि लोकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रमणदीप नावाचा एक तरुण गेल्या अनेक दिवसांपासून राम न्यूरो सेंटरमध्ये दाखल होता. कुटुंबियांच्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजल्यानंतर जेव्हा नातेवाईकांनी मृतदेह मागितला, तेव्हा रुग्णालयाने त्यांना हातात ४ लाख रुपयांचं बिल दिलं.

कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्यांना उपचाराच्या खर्चाबद्दल कोणतीही योग्य माहिती दिली गेली नाही आणि बिलाबद्दलही आधी काही सांगितलं नाही. मागितलेली रक्कम खूप जास्त होती, तसेच बिलामध्ये अनेक संशयास्पद एंट्रीज होत्या. रुग्णालय प्रशासनाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, जोपर्यंत बिलाची रक्कम भरली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह दिला जाणार नाही.

या घटनेची माहिती मिळताच रमणदीपचे मित्र, शेजारी आणि काही सामाजिक कार्यकर्ते तातडीने रुग्णालयात पोहोचले. बघता बघता रुग्णालयाच्या बाहेर आणि आत तणाव वाढला. सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला एका सामान्य कुटुंबाला इतकं मोठं बिल कसं दिलं? असा सवाल विचारला. त्यांचं संभाषण लवकरच वादात बदललं आणि वातावरण तापलं. सुमारे अडीच तास रुग्णालयात हा गोंधळ आणि वादविवाद सुरू होता.

सतत वाढलेल्या दबावामुळे आणि वादामुळे अखेरीस रुग्णालय प्रशासनाला झुकावं लागलं. दीर्घकाळ चाललेल्या वादविवाद आणि मध्यस्थीनंतर ४ लाख रुपयांचं बिल ५०,००० रुपयांचं करण्यात आलं. हा तडजोडीचा करार होताच रुग्णालयाने रमणदीपचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. कुटुंबियांनी सांगितलं की, ते आधीच मृत्यूमुळे दु:खी होते, त्यात त्यांना भलंमोठं बिल देण्यात आलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage: Hospital Demands ₹4 Lakh Before Releasing Body, Family Alleges

Web Summary : Punjab hospital demanded ₹4 lakh before releasing a patient's body, sparking outrage. Family alleged inflated bills and lack of prior cost information. Intervention led to a reduced bill of ₹50,000 before release.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलMONEYपैसाPunjabपंजाब