शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आकाशपाळण्यातून पडून मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 14:34 IST

ईदच्या दिवशीच घडली दुर्घटना; कुटुंबावर शोककळा

ठळक मुद्देऐन ईदच्या दिवशी ही घटना घडल्याने मुलीच्या कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली. ही घटना घडल्यानंतर पाळणा चालवणाऱ्या चालकाने तेथून पलायन केले.पाळणाचालकाच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिद्दीकी यांनी केला आहे.

भिवंडी - रमजान ईदनिमित्त शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाशपाळण्यातून पडून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ऐन ईदच्या दिवशी ही घटना घडल्याने मुलीच्या कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली.मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दीकी (वय ९) हे मृत मुलीचे नाव असून ती कापतलाव जैतुनपुरा या भागात आईवडिलांसोबत राहत होती. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुस्कान आपल्या चुलत बहिणीसोबत समदनगर येथील खेळण्यांच्या जत्रेत गेली. तेथे हाताने फिरवल्या जाणाऱ्या छोट्या आकाशपाळण्यात ती बसली. पाळणा फिरताना वर गेल्यानंतर जीव घाबरून तिचा तोल गेला. ती खाली पडत असताना पाळण्याच्या खांबावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात ती पडली. ही घटना घडल्यानंतर पाळणा चालवणाऱ्या चालकाने तेथून पलायन केले.मुस्कानच्या कुटुंबीयांनी जखमी मुस्कानला स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाशपाळणा फिरवणाऱ्या चालकाने तत्काळ मुलीला वैद्यकीय मदत दिली असती, तर ती बचावली असती. पाळणाचालकाच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिद्दीकी यांनी केला आहे.

गुन्हा दाखल करणार

मुस्कानच्या दुर्दैवी मृत्यूबाबत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कसून चौकशी करत असून तपासाअंती पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे यांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसBhiwandiभिवंडी