क्षुल्लक कारणावरून मारहाणीत मृत्यू; आरोपीला अटक, चंद्रपूरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:05 IST2021-07-15T11:07:11+5:302021-07-15T15:05:06+5:30
प्राप्त माहितीनुसार, मृतक विशेषराव आत्राम (४५) व प्रशांत हंसकर या दोघात गावातील चौकात कडाक्याचे भांडण झाले.

क्षुल्लक कारणावरून मारहाणीत मृत्यू; आरोपीला अटक, चंद्रपूरमधील घटना
कोरपना (चंद्रपूर) : तालुक्यातील सोनुर्ली येथे शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीतून एकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, मृतक विशेषराव आत्राम (४५) व प्रशांत हंसकर या दोघात गावातील चौकात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात विशेषराव जलपती आत्राम याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवण्यात आला. याप्रकरणी आरोपी प्रशांत हंसकर (२८) याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास कोरपनाचे नुकतेच रुजू झालेले ठाणेदार सदाशिवराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव व कोरपना पोलीस करीत आहेत.