शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मारहाण झाल्याने हर्सुल कारागृहातील आरोपीचा मृत्यू, नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:04 IST

हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला .योगेश रोहिदास राठोड(२९, भारंबा तांडा  ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद ) असे मयताची नाव आहे.

औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला .योगेश रोहिदास राठोड(२९, भारंबा तांडा  ता.कन्नड. हल्ली मुक्काम कृष्णा ईश्वर कॉलनी मयूरपार्क, औरंगाबाद ) असे मयताची नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,योगेश राठोड हा मिस्त्री काम काम करतो त्याच्या विरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात 2015मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते . १७ जानेवारी रोजी हर्सूल पोलिसांनी योगेशला अटक करुन  न्यायालयात हजर केले होते. त्याची जामीन घेण्यासाठी कुणीच न आल्याने त्याला न्यायालयाने कारागृहात  पाठवले. वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी त्याला जेलच्या ताब्यात सायंकाळी सात वाजता दिले होते .त्यानंतर मध्यरात्री दीड वाजता कारागृह पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. योगेश राठोडला प्रचंड मारहाण करण्यात आल्याने तो बेशुद्ध झाला होता .त्याच्यावर घाटी येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्याच्या हातावर  ,पाठीवर, पायाभर आणि पोटात मारहाणीच्या खूणा स्पष्टपणे दिसत होत्या . आय सी यू मध्ये उपचार सुरू असताना शनिवारी रात्री  त्याची प्राणज्योत मालवली.

कारागृह पोलिसावर खूनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी  कारागृहातील  पोलिसांनी योगेशला बेदम  मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी योगेशचा भाउ सचिनने  केली. योगेशचा मृत्यू झाल्याचे कळताच जवळपास पाचशे हुन अधिक  नातेवाईक घाटीत जमा झाले होते. जोपर्यंत दोषीवर  गुन्हे दाखल होत नाही आणि त्याना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता .घटनेची माहिती मिळताच तातडीने घाटी रुग्णालयात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे , गोवर्धन कोळेकर ,गुणाजी सावंत बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी