शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

क्रूरता ! मूकबधिर तरुणीची बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या; एकजण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 19:38 IST

बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला दगडाने ठेचून खून

ठळक मुद्दे कुटुंबीयांसह पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार

बिलोली (जि. नांदेड) : शहरातील झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय अविवाहित मूकबधिर तरुणीवर बलात्कार करून दगडाने ठेचून खून केल्याकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने एका आरोपीस बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. दरम्यान, कुटुंबीयांसह पोलिसांच्या मदतीने सदर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपलेली मयत मूकबधिर सुनीता नबाजी कुडके (वय २७) आपल्या बहिणीकडे शहरातील झोपडपट्टी(नवीन आबादी) येथे वास्तव्यास होती. मयत तरुणीची बहीण मोलमजुरी करून मूकबधिर तरुणीचा सांभाळ करत होती. ९ डिसेंबर रोजी सदर बहीण नित्यनियमांप्रमाणे मोलमजुरीस गेली होती. सायंकाळी कामाहून परतल्यानंतर मूकबधिर बहीण घरी नसल्याने शोधाशोध सुरू केली; परंतु झोपडपट्टीलगत असलेल्या जि.प.शाळेच्या पाठीमागे शौचास गेल्यानंतर सदर बहिणीवर काही नराधमांनी बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला दगडाने ठेचून खून केल्याचे आढळून आले.

शेजाऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सहा. पो. निरीक्षक रामदास केंद्रे, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर, रत्नाकर जाधव, गंगाधर कुडके यांना देताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयास सुपूर्द केला. सदर घटनेबाबत मयताचे चुलत भाऊ दयानंद विठ्ठल कुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३०२,३७६,३५४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे करीत आहेत. दरम्यान, सदर घटनेचा विविध स्तरातून निषेध होत असून, या प्रकरणातील नराधमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सहायक पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेटआरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक व समाजबांधवांनी घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री सहा. पोलीस अधीक्षक विजय काबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी श्वान पथकाच्या साहाय्याने बिलोली येथील एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले. सदर मृतदेहावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Rapeबलात्कारNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी