नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील 23 वर्षीय तरुणावर शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणाला व त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी आलेल्या तरुणाला तिन्ही अनोळखी आरोपीनी मारहाण करून फरार झाले आहे. जखमी तरुणाच्या जबाबावरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाजवळील गावदेवी मंदिराजवळ नीरज समरदेव यादव (23) हा परिवारासोबत राहत असून तो ड्राईव्हरचे काम करतो. 1 जूनला रात्री साडे नऊच्या सुमारास घराच्या बाहेर मित्रासोबत बोलत उभा होता. त्याचवेळी दारूच्या नशेतील सचिन नावाचा तरुण आला आणि कोणत्या तरी कारणावरून हुज्जत घालत होता. निरजच्या बहिणीने सचिनला तिकडून जाण्यास सांगितले. सचिनने नंतर दोन मित्रांसोबत निरजच्या घराजवळ फायटर आणि चाकू घेऊन येत निरजवर चाकूने हल्ला चढविला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मित्रालाही या तिघांनी मारहाण केली आहे. नीरज आणि त्याच्या मित्राला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. वालीव पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला असून फरार तीन आरोपीच्या शोधात आहे.
तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 19:46 IST
जखमी तरुणाच्या जबाबावरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.
तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
ठळक मुद्दे जखमी तरुणाला व त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी आलेल्या तरुणाला तिन्ही अनोळखी आरोपीनी मारहाण करून फरार झाले आहे. नीरज समरदेव यादव (23) हा परिवारासोबत राहत असून तो ड्राईव्हरचे काम करतो.