Deadly attack kills boy, father seriously injures in yavatmal arni hrb | प्राणघातक हल्ल्यात मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

प्राणघातक हल्ल्यात मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

आर्णी (यवतमाळ): तालुक्यातील सुकळी येथे वडील व मुलावर गावातीलच व्यक्तिकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये मुलगा सूर्यकांत साहेबराव वारसवाड वय (25 वर्ष ) हा जागीच ठार  झाला,  तर वडील साहेबराव नामदेव वारसवाड जे गंभीर जखमी झाले.  

त्यांना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. सोमवारी सायंकाळी आर्णी- माहूर रोडवरील सुकळी गात ही घटना घडली. हल्यायामागील नेमके कारण कळू शकते नाही. आर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर घटना साडे सात वाजता घडली आहे. मारेकरी व मृतक हे शेजारी शेजारीच राहतात. गणेश रामभाऊ मोरेश्वर(25) असे हल्लेखोराचे नाव आहे. शुल्लक वादातून घटना घडल्याचे गावकरी सांगत आहेत. 

महत्वाचे म्हणजे आरोपीचे पुढील १५ ते २० दिवसांनी लग्न होणार होते. 

Web Title: Deadly attack kills boy, father seriously injures in yavatmal arni hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.