शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"पापा सॉरी, लिहिलंय ते वाचून घ्या"; 'कोरियन गेम'च्या विळख्याने तीन बहि‍णींनी स्वतःला एकत्र संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:20 IST

मोबाईल गेमिंगच्या नादात तीन बहिणींनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.

Ghaziabad 3 Sisters Die: मोबाईल गेमिंगच्या विळख्याने उत्तर प्रदेशात एका कुटुंबाचा भीषण अंत केला आहे. गाझियाबादमधील टीला मोड परिसरात असलेल्या भारत सिटी सोसायटीमध्ये तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी ९ व्या मजल्यावरून उडी मारून सामूहिक आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने केवळ उत्तर प्रदेशच नाही, तर संपूर्ण देश हादरला आहे. कोरियन लवर या टास्क-बेस्ड ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्यामुळे या मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशिका (१६ वर्षे), प्राची (१४ वर्षे) आणि पाखी (१२ वर्षे) या तिघी बहिणी आपल्या कुटुंबासह भारत सिटी सोसायटीच्या बी-१ टॉवरमधील ९०७ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या. मंगळवारी रात्री २ च्या सुमारास या तिघींनी एकमेकींचे हात पकडून बाल्कनीतून खाली उडी घेतली. जमिनीवर पडण्याच्या जोराच्या आवाजाने सोसायटीमधील रहिवाशांना जाग आली, त्यांनी धाव घेतली असता तिघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

सुसाईड नोट आणि डायरी

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट आणि एक डायरी सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये एका रडणाऱ्या मुलीचे इमोजी काढून तिघींनी, "आय एम सॉरी पापा... आई लव्ह यू मम्मी-पापा. या डायरीत जे काही लिहिले आहे ते सर्व वाचून घ्या, कारण तेच सत्य आहे," असं लिहीले. या डायरीमध्ये तिघींनी 'वी लव्ह कोरियन गेम्स' असेही नमूद केले आहे. मात्र, डायरीतील सविस्तर मजकूर अद्याप पोलिसांनी उघड केलेला नाही.

'कोरियन लवर' गेमचा जीवघेणा टास्क?

मृत मुलींचे वडील चेतन कुमार यांनी सांगितले की, कोरोनापासून तिन्ही मुलींना मोबाईल गेमचे प्रचंड व्यसन लागले होते. त्या कोरियन लव्हर नावाचा ऑनलाइन टास्क-बेस्ड गेम खेळायच्या. या गेमची सवय इतकी भयानक होती की, तिघींचे खाणे, पिणे, झोपणे आणि शाळेत जाणे हे सर्व एकाच वेळी चालायचे. याच व्यसनापोटी त्यांना एखादा जीवघेणा टास्क मिळाला होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

गाझियाबाद पोलिसांनी तिन्ही मुलींचे मोबाईल फोन जप्त केले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. सध्या हे फोन लॉक असून, ते उघडल्यानंतरच या आत्महत्येमागील नेमके गूढ उकलण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सांगितले की, या मुलींचे शालेय शिक्षणही नियमित सुरू नव्हते आणि त्या तासन् तास मोबाईलमध्ये गुंग असायच्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Ghaziabad: Three sisters' suicide linked to 'Korean Lover' game addiction.

Web Summary : Three sisters in Ghaziabad committed suicide, possibly driven by addiction to the 'Korean Lover' online game. A suicide note mentioned the game. Police are investigating the deadly task and the girls' mobile phones, finding they were deeply engrossed in gaming.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलGame Addictionव्हिडिओ गेम व्यसनPoliceपोलिस