शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकंदमध्ये कचऱ्यात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:28 IST

महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी कचऱ्यात आणून टाकला

ठळक मुद्देलोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

वाघोली : लोणीकंद-केसनंद रस्त्याच्या कडेला खंडोबामाळ परिसरातील कचऱ्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी (दि.१) आढळला आहे. महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी कचऱ्यात आणून टाकला असल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंदचे पोलीस पाटील बाळासाहेब कंद यांना लोणीकंद-केसनंद रस्त्याच्या कडेला खंडोबामाळ परीसरामध्ये पाण्याच्या टाकीच्या विरुद्ध बाजूकडील कागदाच्या कचऱ्यात अनोळखी वय अंदाजे ३0 ते ३५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधित बाब लोणीकंद पोलिसांना सांगितली. लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा केला. तीन ते चार दिवसांपासून मृतदेह कागदी कचऱ्यात पडून असल्याने उग्र वास येऊन मृतदेह कुजलेला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाचा उलगडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस