१० दिवसांपूर्वीच मुंबईहून परतला; रात्री झोपला अन् सकाळी मृतदेहच सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 20:26 IST2023-06-11T20:26:11+5:302023-06-11T20:26:33+5:30
सकाळी युवकाची आई अनिता देवी उठल्यानंतर ती वरच्या छतावर गेली.

१० दिवसांपूर्वीच मुंबईहून परतला; रात्री झोपला अन् सकाळी मृतदेहच सापडला
बस्ती - शहरातील महादेवा गावातील २१ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. या मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवले. २१ वर्षीय सोनू विश्वकर्मा शनिवारी रात्री जेवण करून झोपायला गेला होता. रात्री अचानक वीज गेली त्यानंतर तो घराच्या छतावर गेला.
सकाळी युवकाची आई अनिता देवी उठल्यानंतर ती वरच्या छतावर गेली. तेव्हा त्याठिकाणचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला. युवकाचा मृतदेह छतावर बनलेल्या ग्रीलला लटकलेल्या अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला. कुटुंबातील इतर लोक धावत छताकडे गेले. त्यांनी युवकाचा मृतदेह पाहून खाली उतरवला. मृत सोनू हा १० दिवसांपूर्वीच मुंबईहून घरी परतला होता.
मृत सोनूचे वडील गंगाराम दुबईत राहून नोकरी करत होते. २ वर्षापूर्वी लागलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळात त्यांचा दुबईतच मृत्यू झाला. १ महिन्यांनी त्यांचा मृतदेह भारतात आला होता. ४ भावंडांमध्ये सोनू दुसऱ्या नंबरवर होता. मोठी बहिण पूजाचे लग्न झाले आहे. छोटा भाऊ मोनू आणि १४ वर्षीय बहिण रोली असं त्यांचे नाव आहे. सोनूचे लग्न झाले नव्हते. त्याच्या संशयास्पद मृत्यूचे रहस्य अजून उलगडले नाही.
घटनेची माहिती काका राम चंदर विश्वकर्मा यांनी पोलिसांना दिली. याबाबत पोलीस अधिकारी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचे वाटते. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.