म्हापशात खुल्या जागेत आढळला मृतदेह; गळ्याभोवती काचेची बाटली खुपसलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:00 IST2023-04-15T19:00:22+5:302023-04-15T19:00:46+5:30
सदर घटना शनिवारी दुपारी ३ च्या दरम्यान समोर आली. खुल्या जागेत एक मृत व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

म्हापशात खुल्या जागेत आढळला मृतदेह; गळ्याभोवती काचेची बाटली खुपसलेली
काशीराम म्हाबरे
म्हापसा: म्हापशातील नवीन आंतरराज्य बसस्थानकाच्या शेजारील खुल्या जागेत एका नेपाळी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. नवीन बी. केनामक ( ३३ वय ) या नेपाळी नागरिकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्याच्या गळ््या भोवती काचेची बाटली खुपसल्याने त्याचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेआहे. गळ््याला लागलेल्या बाटलीच्या काचामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्या पूर्वी याच परिसरात एका लहान बालकाचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.
सदर घटना शनिवारी दुपारी ३ च्या दरम्यान समोर आली. खुल्या जागेत एक मृत व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तातडीने पोलीस घटना स्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नवीन गळ््यात काचेचा तुकडा अडकल्यानेआढळून आले. तसेच प्रेताच्या शेजारी पोलिसांना दारूची रिकामी बाटली तसेच फोडलेल्या बाटलीच्या काचा आढळून आल्या. सदर प्रेत ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.
उत्तर गोव्याचे अधिक्षक निधीन वाल्सन, उपअधिक्षक जिवबा दळवी, निरीक्षक परेश नाईक यांनी घटना स्थळी उपस्थित होऊन पाहणी केली. संबंधीत घटनेवर पोस्ट मार्टम अहवालानंतर भाष्य करणे शक्य होईल असे वाल्सन म्हणाले. पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.