मीरा रोड परिसरात एकाच कुटुंबातील तीन लोकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या आत्महत्यांमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये आई, मुलगी आणि मुलाचा समावेश आहे. मीरा रोडव येथील नरेंद्र पार्क पार्क कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत ही धक्कादायक घटना घडली.सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा रोड परिसरातील नवीन नगर पोलिस करत आहेत. तिन्ही मृतदेह पोलिसांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसरीन वाघू (47), मुलगी सय्यद नाझ (21) आणि मुलगा मोहम्मद अर्श (13) अशी मृतांची नावे आहेत.
एकाच कुटुंबातील तिघांचे सापडले मृतदेह; घरात आढळल्या झोपेच्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:04 IST
Suicide Case : सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा रोड परिसरातील नवीन नगर पोलिस करत आहेत.
एकाच कुटुंबातील तिघांचे सापडले मृतदेह; घरात आढळल्या झोपेच्या गोळ्या
ठळक मुद्देनसरीन वाघू (47), मुलगी सय्यद नाझ (21) आणि मुलगा मोहम्मद अर्श (13) अशी मृतांची नावे आहेत.