शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Daya Nayak : दया नायक यांची सात वर्षात विदर्भात दुसऱ्यांदा बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 21:46 IST

Daya Nayak : यापूर्वी रुजू होण्यास स्पष्ट नकार : आताही शंका-कुशंका 

ठळक मुद्दे आता ते जात पडताळणी प्रमाणपत्र तपासण्यासाठी गोंदियात रुजू होणार का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. 

नरेश डोंगरेनागपूर : गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस निरीक्षक दया नायक यांची सात वर्षात विदर्भात झालेली ही दुसरी बदली होय. यापूर्वी त्यांनी नागपुरात रुजू होण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आता ते जात पडताळणी प्रमाणपत्र तपासण्यासाठी गोंदियात रुजू होणार का, असा प्रश्न चर्चेला आला आहे. 

'नाम ही काफी है', अशी स्वतःची प्रतिमा तयार करणारे दया नायक१९८५ ला मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते. अंडरवर्ल्डमधील अनेक कुख्यात गुंडांचा एकापाठोपाठ एनकाउंटर करून नायक यांनी प्रचंड दरारा निर्माण केला होता. यानंतर राज्यातील काही नेते तसेच पोलिस दलातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांचे लाडके म्हणून  त्यांची ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस दलच नव्हे तर बॉलीवूडलाही दया नायक या नावाने भुरळ घातली होती. या पार्श्वभूमीवर, २००६ मध्येकर्नाटक येथे नायक यांनी त्यांच्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी उद्घाटन केले आणि तेथून नायक यांचे वासे फिरले. नायक यांच्या बेहिशेबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी,  अटकेची कारवाई झाली. त्यानंतर मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. 

२०१२ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आणि जानेवारी २०१४ मध्ये त्यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. त्यावेळी नागपुरात रुजू होण्यास नायक यांनी स्पष्ट नकार दिला होता.  त्यांचे हे वर्तन त्यावेळी त्यांना अडचणीत आणनारे ठरले आणि २०१५ मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. मात्र, वर्षभरात ते पुन्हा मुंबईत झाले. सध्या मुंबई एटीएस मध्ये ते सेवारत होते. आज त्यांची गोंदियाला बदली झाल्याचा आदेश निघाला. त्यामुळे राज्य पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. दया नायक गोंदियात रुजू होतील का, असाही प्रश्न उपस्थित  झाला आहे. कसे रमणार जात पडताळणीत ? 'घोड्या'चे अचूक तंत्र अवगत असणारे आणि भल्याभल्या गुंडांना कंठस्नान घालणारे दया नायक जात प्रमाणपत्र पडताळणीत कसे रमतील, असा प्रश्न या बदलीच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मुंबई, नागपूरसह ठिकठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दया नायक गोंदियात रुजू होणार नाही, असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले आहे. तर ते येथे रुजू होणे म्हणजे, चमत्कार ठरेल, असेही काहींनी म्हटले आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliceपोलिसnagpurनागपूरMumbaiमुंबई